♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

बुलडाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर दोन कारमध्ये अपघात; ३ ठार २ जखमी

MH 28 News Live, बुलढाणा : जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील शिवनापिसा गावाजवळ दोन कारमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. अपघातात 3 जण ठार तर २ जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींना मेहकर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

तीन जण जागीच ठार : आज १६ जानेवारी रोजी सकाळी समृद्धी महामार्गावरील मेहकर जालना रोडवर एका कारने दुसऱ्या कारला मागून धडक दिल्याने ३ जणांचा मृत्यू झाला तर २ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असल्याचे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

नागपूरच्या दिशेने जाताना अपघात : मिळालेल्या माहितीनुसार, १६ जानेवारी रोजी सकाळी समृद्धी महामार्गावर औरंगाबादहून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या दोन कारचा अपघात झाला आहे. याचदरम्यान समृद्धी महामार्गावर बीबी ते शिवनापिसा गावाजवळ स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एमएच 49 बीआर 6082, मेहकरपासून काही अंतरावर पुढे जात असताना मारुती सुझुकी कार क्रमांक MH32C 4490 या कारमध्ये तीन जण स्वार होते. या दोन्ही गाड्यांचा अपघात इतका भीषण होता की या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा मृत्यू रूग्णालयात उपचार घेत असताना झाला.

जखमींवर उपचार सुरू : अपघातानंतर तत्काळ महामार्ग पोलीस पीएसआय गजानन उज्जैनकर, गोविंदा उबरहंडे, हरी ओम काकडे, विठ्ठल काळुसे, संदीप किरके, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान नितीन पवार, जयकुमार राठोड, क्यूआरटी कर्मचारी अविनाश मकासरे, रुस्तुम कुट्टे, कैलास जखमी रुग्णवाहिकेच्या १०८ क्रमांकाच्या डॉ. दिगंबर शिंदे यांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात दाखल केले. जखमींवर मेहकरच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129