
नोंदणीकृत बांधकाम कामगारांना घरकुलासाठी दोन लक्ष रुपयांचे अनुदान तातडीने द्या – संजय वाकोडे यांची मागणी
MH 28 News Live, चिखली : राज्य शासनाच्या महाराष्ट्र बांधकाम कामगार महामंडळाकडे नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना दोन लक्ष रुपये अनुदान देण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः व कामगार मंत्री यांनी जाहीर केल्या प्रमाणे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना घरकुलासाठी दोन लक्ष रुपये तत्काळ देण्यासंदर्भात निर्देश देण्यात यावे, चिखली न. प. अंतर्गत ५६५ लाभार्थ्यांचे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पात्र आहेत त्यांना राज्य शासनाचे एक लाख साठ हजार रुपये प्राप्त झालेले आहेत. तरी आपण जाहीर केल्याप्रमाणे संबंधित लाभार्थ्यांना बांधकाम कामगारांना अनुदान प्राप्त झाल्यास त्यांचे सुंदर घरकुलाचे स्वप्न पूर्ण होईल; तरी पात्र लाभार्थी असलेल्या बांधकाम कामगारांना घरकुल २ लाख रुपयांचे घरकुल अनुदान त्वरीत देण्यात यावे अशी मागणी संजय वाकोडे यांनी केली आहे.