♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

नवीन ठाणेदाराला दोन नंबरवाल्यांची सलामी. धामणगाव बढे येथे अवैध वरली मटका डंके की चोट पर सुरुच… पोलीस प्रशासन दखल घेणार का ?

MH 28 News Live, धामणगाव बढे : धामणगाव बढे व परिसरात वरली मटका जुगारासह अवैध दारु, गुटका विक्रि राजरोसपणे होत आहे. येथील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळल्याचे चित्र असून नवीन रुजू झालेल्या ठाणेकरांसह पोलीस प्रशासन याची दखल घेऊन कारवाई करेल काय असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

धामणगाव बढेच्या बसस्थानक परिसरातील शाळा व विठ्ठल मंदीरास लागून वरली ची दुकानी थाटल्याने काही दीवसापुर्वी रहदारीस अडथडा निर्माण होवुन धा.बढे येथिल एका दुचाकीची धडक बसल्याने घटना स्थळीच मृत्यू झाला ही घटना याच ठीकाणी घडली असुन या दुर्दैवी घटनेने कुणालाही सोयरसुतक नाही. कायदा व सुव्यवस्थेची खिल्ली उडवून पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलीन करण्याकरिता अवैध व्यवसायीकांसह हप्तेखोरांचाही यात समावेश आहे. विद्यार्थी दशेतील तरुण या प्रलोभनाच्या आकर्षणाला बळी पडत असुन अनेक महीलांचे संसार उध्वस्त होत आहेत. अनेक महीलांचे संसार उघड्यावर येवु नये या करिता ग्रामसभेद्वारे मागणी करुन गावातून कायमस्वरुपी अवैध धंदे बंद करण्यासाठी या पुर्वीच धामणगाव बढे ग्रा.पं च्या ग्रामसभेत १९९ नागरीकांचे उपस्थितीत एकमुखी ठराव मंजुर केला आहे; या ठरावाला न जुमानता बेलगाम सुरु असलेल्या अवैध धंद्यांमुळे नागरिकांच्या अधिकाराचे हनन व थट्टा सुरू आहे. या परिस्थितीकडे नव्याने रुजू झालेले ठाणेदार भोरकडे सहा. जिल्हा पोलीस अधिक्षक कडे लक्ष देतील का असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129