♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

‘ गांधी गोडसे ‘ चित्रपटाच्या वादात ए आर रेहमान ची उडी. दिग्दर्शकाच्या बाजू घेत म्हणाले…

MH 28 News Live : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी कायमच आपल्या चित्रपटातून सामाजिक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. ते लवकरच ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची एक झलक पाहायला मिळाली होती. यात मराठमोळा अभिनेता दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर नथुरामची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या टीझरलाही उत्तम प्रतिसाद मिळाला. नुकताच याचा ट्रेलरसुद्धा प्रदर्शित झाला.

गांधी हत्येच्या सीननंतर नथुरामला अटक होऊन तो तुरुंगात दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात ते एकमेकांसमोर आपले विचार मांडताना दाखवले आहेत. म्हणूनच या चित्रपटाला एक वैचारिक युद्ध म्हणून सादर करण्यात आलं आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक राजकुमार संतोषी तब्बल ९ वर्षांनी पुनरागमन करत आहेत. या चित्रपटामुळे राजकुमार संतोषी यांना जीवे मारण्याच्या धमक्यादेखील आल्या, नुकताच त्यांनी याचा खुलासा केला आहे. आता खुद्द ए आर रेहमान यांनीदेखील यावर भाष्य केलं आहे.

राजकुमार संतोषी यांच्यावर टीका करणाऱ्यांचा रेहमान यांनी समाचार घेतला आहे. खरंतर रेहमान हे कधीच उघडपणे त्यांची बाजू मांडत नाहीत, पण यावेळी ते संतोषी यांच्या बाजूने बोलले आहेत. नथुराम गोडसेचं उदात्तीकरण केल्याचा आरोप संतोषी यांच्यावर होत आहे. याबद्दलच रेहमान यांनी भाष्य केलं आहे.

‘पीटीआय’शी संवाद साधताना रेहमान म्हणाले, “जी लोक टीका करत आहेत, त्यांनी चित्रपट पाहिलेला नाही, त्यांना वाटतंय की ट्रेलरमधून एकच बाजू दाखवली जात आहे. चित्रपट निर्मात्यांच्या बाजू घेण्यामुळे लोक त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही आहेत. दुर्दैवाने राजकुमार संतोषी याचे बळी ठरले आहेत.” नुकतंच राजकुमार संतोषी यांनी मुंबई पोलिसांकडे सुरक्षेसाठी एक पत्र लिहिलं होतं, संतोषी यांच्या या चित्रपटात सेन्सॉर बोर्डाने एकही बदल न सुचवता प्रमाणपत्र दिलं आहे. ‘गांधी गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट २६ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’शी याची टक्कर होणार आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129