
संभाजी नगर परिसरातील त्या रोडरोमीओंचा बंदोबस्त करा- नागरिकांचे ठाणेदारांना साकडे
MH 28 News Live, चिखली : स्थानिक संभाजी नगर परिसरात अज्ञात बुलेट धारकांसह रोडरोमीओंचा धुमाकूळ वाढला असून याबाबत कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे तक्रार वजा निवेदन संभाजी नगर परिसरातील नागरिकांच्या वतीने दि. २८ जानेवारी २०२३ रोजी चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील यांना देण्यात आले.
सदर निवेदनात नमूद केल्या प्रमाणे या रस्त्यावर आदर्श विद्यालय असून शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी या मार्गावर रोडरोमीओंचा धुमाकूळ चाललेला असतो.
या मार्गावर गतीरोधक नसल्याने सुसाट रेसिंग सुरू असते, याबाबत तातडीने कारवाई करण्यात यावी. असे ही निवेदनात नमूद केले आहे. निवेदन देते वेळी परिसरातील सत्य कुटे, मंगेश चवरे, सुमेध जाधव, पत्रकार रेणुकादास मुळे, नामदेव साळवे, सखाराम राऊत यांच्या सह नागरिक उपस्थित होते.