♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

क्रिप्टो’ करन्सी घोटाळा झाल्याच्या जालन्यात १०३ तक्रारी दाखल; ३५० कोटींचा घोटाळा झाल्याची शक्यता

MH 28 News Live, चिखली : क्रिप्टो’ करन्सीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. जालना पोलिसांनी या घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल करून याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवला आहे. मात्र या घोटाळ्याची व्याप्ती आता दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर येत आहे. या प्रकरणात आतापर्यंत आर्थिक गुन्हे शाखेकडे जवळपास 103 तक्रारी दाखल झाल्या आहेत. या सर्व तक्रारदारांचे जबाब घेण्याचे काम आर्थिक गुन्हे शाखेकडून केले जात आहे. सर्वाधिक गुंतवणूक केलेल्या १७ जणांचा पोलिसांनी जबाब घेतला आहे. इतरांचाही जबाब घेतला जात असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे यातील आरोपी किरण खरात व त्यांची पत्नी दीप्ती खरात यांच्यासह विजय झोल व अन्य साथीदार अजूनही फरार आहेत.

ऋषिकेश काळे यांच्या तक्रारीवरून क्रिप्टो करन्सी कॉइन (जीडीसी कॉइन) प्रमोटर संशयित किरण खरात आणि त्यांची पत्नी दीप्ती खरात यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडे जवळपास १०३ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विशेष म्हणजे यात सर्वाधिक गुंतवणूक करणाऱ्या १७ जणांनी जवळपास एक कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यांचे पोलिसांनी तातडीने जबाब घेतले आहेत. त्यांच्याकडून बँक पासबूक, आधार कार्ड यासह इतर महत्त्वांची कागदपत्रे घेतली जात आहेत. इतर तक्रारदारांची गुंतवणूक कमी आहे. त्यांचेही जबाब घेतले जात आहे. दरम्यान, ज्या लोकांची फसवणूक झाली आहे, त्यांनी तक्रारी करण्याचे आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आले आहे.

जालन्यात क्रिप्टो करन्सी कॉइनच्या (Cryptocurrency Coins) नावाखाली कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणुकीचा प्रकार समोर आलाय. जालना पोलिसांनी या घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल करून याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवला आहे. मात्र या घोटाळ्याची व्याप्ती आता दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर येत आहे. दरम्यान, ज्या लोकांची फसवणूक झाली आहे, त्यांनी तक्रारी करण्याचे आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आले आहे.

साडेतीनशे कोटी रुपयांची फसवणूक

जालन्यात समोर आलेल्या क्रिप्टो करन्सी कॉइन (जीडीसी कॉइन) प्रकरणात साडेतीनशे कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं पुढे आले आहे. तर शिवाय, पोलिसांनी मुख्य कंपनीची वेबसाइट ट्रेस केली आहे. ही वेबसाइट परराज्यातील असल्याचेही सांगण्यात येत आहे. यातील आरोपी किरण खरात व त्यांची पत्नी दीप्ती खरात यांच्यासह विजय झोल व अन्य साथीदार हेही फरार झाले आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी खरात पतीपत्नीच्या बँक खात्याची माहिती मागविली असून, ते गोठविण्यात येणार आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129