♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

चिखली नजिक भीषण अपघातात दोन ठार, एक गंभीर तर दोघे जखमी

MH 28 News Live, चिखली : चिखलीच्या दक्षिणेला असलेल्या साकेगाव रस्त्यावर रात्री साडेबाराच्या सुमारास रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला कारची धडक लागून भीषण अपघात घडला. यामध्ये दोघेजण घटनास्थळीस ठार झाले एक जण गंभीर असून दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे.

याबाबत थोडक्यात माहिती अशी की; येथील रेणुका देवी मंदिर परिसरात राहणारे सुनील किसनराव देव्हडे ( ४० ), हर्षल बजरंग पांडे ( ३५ ), आकाश रमेश चिंचोले ( २६) आणि यश वाधवानी ( २६ ) हे चौघे युवक साकेगाव येथे राहणाऱ्या पप्पू परिहार यास घरी सोडण्यासाठी रात्री १२ वाजेदरम्यान सुनील देव्हडे याच्या MH 28 V 6911 या क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारने साकेगाव येथे चालले होते. या दरम्यान अकस्मात रस्त्याच्या कडेने असलेल्या झाडाला कारची जोरदार धडक लागली. ही धडक एवढी जबरदस्त होती की या अपघातात सुनील देव्हडे आणि हर्षल पांडे हे दोघे घटनास्थळीच ठार झाले.

दरम्यान या अपघाताची माहिती मयत सुनील देव्हडे याचे बंधू माजी नगरसेवक गोपाल देव्हडे यांना रात्री १ वाजेनंतर मिळाली. त्यांनी आपल्या मित्र व नातलगांसह ताबडतोब घटनास्थळी भेट घेतली आणि मदतकार्य सुरू केले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पप्पू परिहार यासह दुखापत झालेल्या आकाश चिंचोले आणि यश वाधवानी यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या अपघाताचे वृत्त समजताच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक कार्यकर्ते ग्रामीण रुग्णालयात पोहोचले. माजी नगराध्यक्ष सुरेशअप्पा खबुतरे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख कपील खेडेकर, सामाजिक कार्यकर्ते धनंजय व्यवहारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रवींद्र तोडकर, माजी नगरसेवक दत्ता सुसर, सुरेंद्र ठाकूर आदींसह अनेकांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती. या दुर्घटनेमुळे शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129