
कोरोना पुन्हा डोके वर काढत असताना जिल्ह्यात मात्र पडला सरकारी डॉक्टरांचा दुष्काळ
MH 28 News Live, बुलढाणा : कोरोना महामारीच्या काळात प्रत्येकाला आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा आयुष्यमान वाढविण्याचा संदेश देणार्या आरोग्य विभागातील दैनंदिन सर्व सामान्यांच्या वैद्यकीय सेवेसाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात वैद्यकीय अधिकार्यांची शस्त्रक्रीया, बालरोग तज्ञ, बधिरीकरण , दंत चिकित्सक, मनोविकृत्ती चिकित्सक, चर्मरोग तज्ञ असे इतर तज्ञांचे 12 पदे शिवाय उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकार्यांची 55 अशी 90 पैकी 67 रिक्त पदे असल्याने आजारपणात रूग्णालयाची पायरी चढणार्या रूग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोरोना व्हायरस पुन्हा एकदा डोके वर काढत असताना सरकारी डॉक्टरांची कमतरता जिल्हा प्रशासनासमोर आव्हान बनून उभी ठाकली आहे.
सामान्य रूग्णालय बुलढाणा (2) नगर परिषद रूग्णालय खामगांव (1), मलकापूर (1), मेहकर (1), शेगांव (1), देऊळगांवराजा (1), जिल्हा कारागृह रूग्णालय (1), ही रिक्त पदे भरली तरच चांगली आरोग्य चिकित्सकाचा लाभ रूग्णांना मिळणार आहे. जिल्हा महिला रूग्णालय बुलढाणाच्या अद्यायावत इमारतीत वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव शासनाकडे सादर केल्यानंतर या महाविद्यालयाच्या परिसरात इतर मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी लागणारा निधी केवळ कागदोपत्री मंजूरीच्या प्रतिक्षेत आहे. बुलढाणा जिल्हास्थानी वैद्यकीय महाविद्यालय झाल्यास सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा रिक्त पदे शिवाय रोजगाराची संधी प्राप्त होईल. राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनहिताचे निर्णय घेण्यात सदा अग्रेसर असतात. शासकीय रूग्णालयातील रिक्त पद भरती सोबतच वैद्यकीय महाविद्यालयाच्या निधीला मंजूरीची हिरवी झेंडी देण्याची आवश्यकता आहे.



