
पदवीधर मतदारसंघासाठी जिल्ह्यात उत्साहात मतदान. जिल्हाधिकारी यांनी केली मतदान केंद्रांची पाहणी
MH 28 News Live, बुलडाणा : अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी आज जिल्ह्यातील ५२ केंद्रांवर सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत उत्साहात मतदान झाले. दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी बुलडाणा शहरातील मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी आवश्यक त्या सूचना केल्या.
आज सकाळपासून बुलडाणा शहरासह जिल्ह्यातील मतदान केंद्रावर मतदारांनी मतदान करण्यासाठी रांगा लावल्या. मतदान करण्यासाठी सर्वच मतदान केंद्रावर सुविधा पुरविण्यात आल्या. मतदारांना येणाऱ्या अडचणी जाणून मतदान केंद्राधिकारी यांनी मार्गदर्शन केले.
दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी सकाळी बुलडाणा तहसिल कार्यालय, एडेड हायस्कूल, शिवाजी हायस्कूल या मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. यावेळी मतदारांना मतदानासाठी एका रांगेत ठेवणे, त्यांच्यासाठी आवश्यक त्या सोयी पुरविणे, मतदान केंद्रावर असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या सोयी आदीबाबत सूचना केल्यात.
जिल्ह्यात एकूण ३७ हजार ८९४ मतदार आहेत. यात १० हजार ७२६ महिला आणि २७ हजार १६८ पुरूष मतदार आहेत. जिल्ह्यात ५२ मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येत आहे. सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत ६ . ३८ टक्के मतदान झाले. दुपारी १२ वाजेपर्यंत १७ . ७९ टक्के मतदान झाले. दुपारी दोन वाजेपर्यंत ३३. ४७ टक्के मतदान झाले.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button