♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी भूमीपूत्र धडकले तहसील कार्यालयावर !

MH 28 News Live, जळगाव जामोद : यावर्षी बुलढाणा जिल्ह्यात प्रचंड अतिवृष्टी होऊन प्रंचड पाऊस पडला त्यामुळे शेतकऱ्याच्या काही पिकाचे नुकसान झाले पिकाची नुकसान होऊन सुद्धा एक रुपयाची फुटकी मदत शासनाने शेतकऱ्याला दिली नाही. ती मदत शेतकऱ्याला तात्काळ मिळायला पाहिजेत यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन दि. ३ फेब्रुवारी रोजी युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी तहसील कार्यालय गाठत नायब तहसीलदार त्यांच्याशी चर्चा केली.

सोयाबीन व कापसाचे भाव कमी झाल्याने शेतकर वर्ग चिंतेमध्ये पडलेला आहे त्यामुळे सोयाबीन कापसामध्ये दरवाढ करून शेतकऱ्यांना आधार द्यावा, खराब झालेल्या सोयाबीन-कापूस तसेच इतर पिकाचा पिक विमा शेतकऱ्यांना देण्यास पिक विमा कंपन्या टाळाटाळ करत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण तयार झालेले आहे कुठतरी पिक विमा कंपनीने खराब झालेल्या पिकाची नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्यक करावे. गेल्या काही दिवसानंतर संपूर्ण जगभरामध्ये गुराढोरांवर लंम्पी आजाराचा प्रादुर्भाव झाला होता. या आजारामुळे अनेक शेतकऱ्यांची जनावरे मरण पावली या मरण पावलेल्या जनावरांचे आर्थिक सहाय्य मिळावे याकरता शेतकऱ्यांनी संबंधित विभागाकडे डॉक्युमेंट जमा केलेले आहेत परंतु शेतकऱ्यांना दगावलेल्या जनावरांची आजपर्यंत ही आर्थिक मदत मिळालेली नाही ही मदत शेतकऱ्यांना द्यावी आणि विशेष म्हणजे जळगाव जामोद तालुक्यातील आसगाव बाजार समितीमध्ये शेतकरी आपला शेतमाल विकायला आणत असतात व्यापारी हे शेतकऱ्यांना मालाची कॅश रक्कम न देता चेक स्वरूपात अदा करतात ज्यावेळेस शेतकरी बँकांमध्ये चेक जमा करायला जातात त्यावेळेस काही बँका ह्या शेतकऱ्याची मागील रक्कम कपात करतात त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. या बँका जर शेतकऱ्यांना न विचारता रक्कम कपात करत असतील तर अशा बँकांवर कारवाई व्हायला हवी आदी विषय पाटील यांनी महसूल विभागासमोर मांडले.

वरील सर्व मागण्या शेतकऱ्यांच्या हक्काच्या असुन ह्या मागण्या मान्य न झाल्यास आठ दिवसामध्ये आंदोलन करण्यात येईल असा इशारा नायब तहसीलदार मार्तंड साहेब यांना अक्षय पाटील यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला. यावेळी अशपाक देशमुख, अजय गिरी, सोपान पाटील, अमीत भिवटे, गुडु मिस्तरी, ऋषिकेश वंडाळे, योगेश ताडे, उल्हास माहोदे तसेच तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129