
आता जिल्ह्यातील फुटबॉलपटूंना जर्मनीत प्रशिक्षणाची विनामुल्य संधी
- MH 28 News Live, बुलडाणा : प्रतिभावान फुटबॉलपटूंचा शोध घेण्यासाठी जर्मनी येथील फुटबॉल क्लबशी करार करण्यात आला आहे. यासाठी जिल्हास्तर एफसी बायर्न महाराष्ट्र कप स्पर्धेचे आयोजन दि. ८ फेब्रुवारी रोजी जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी येथे करण्यात आले आहे. यातून जर्मनी येथील प्रशिक्षणासाठी खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातील १४ वर्षाखालील खेळाडूंनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आला आहे.
या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या संघांनी स्पर्धास्थळी सकाळी ९ वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. या क्रीडा स्पर्धांमधून विजयी संघ विभाग आणि विभागस्तरावरुन विजयी संघ राज्यस्तरावर खेळण्यास पात्र राहिल. तसेच पराभूत संघातून पाच खेळाडू निवड चाचणीद्वारे पुढील स्तरावर पाठविण्यात येतील. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शाळांनी खेळाडूंचा प्रवेश अर्ज आणि खेळाडूंचे ओळखपत्र, शालेय क्रीडा स्पर्धेकरीता निर्धारीत केलेल्या विहित नमुन्यात तयार करावे, तसेच सोबत आधारकार्ड, बोनाफाईड प्रमाणपत्र आदीसह प्रवेश अर्ज दि. ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमा करणे आवश्यक आहे.
राज्यस्तराकरीता पात्र खेळाडू करीता आधारकार्ड, पॅनकार्ड, बोनाफाईड प्रमाणपत्र आणि निवसाबाबतची कागदपत्रे आणि असल्यास पासपोर्टची झेरॉक्स प्रत आदी सादर करणे आवश्यक आहे. क्रीडा स्पर्धेकरीता खेळाडूची जन्मतारीख दि. १ जानेवारी २००९ किंवा त्यानंतरची असणे आवश्यक आहे. राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये प्राविण्यप्राप्त खेळाडूंना जर्मनीमधील म्युनिच येथे फुटबॉलचे अद्यावत प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. या प्रशिक्षणाकरीता येणारा प्रवास, निवास, भोजन, प्रशिक्षण आदीचा संपूर्ण खर्च शासनातर्फे करण्यात येणार आहे. जर्मनी येथील म्युनिच येथे जाण्यासाठी पात्र खेळाडूना कोणताही आर्थिक खर्च करावा लागणार नाही.
जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समुदायाच्या सर्व शाळांनी या क्रीडा स्पर्धेमध्ये संघ सहभागी करावे, यासाठी अल्पसंख्याक पालक, शिक्षक आणि खेळाडूना या क्रीडा स्पर्धेत सहभागी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील १४ वर्षाआतील मुलांच्या संघानी एफसी बायर्न फुटबॉल महाराष्ट्र कप या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये आवश्यक कागदपत्रासह दि. ८ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ९ वाजता जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलढाणा येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button