
वरली मटका खेळणाऱ्या ७ जणांना अटक, उदयनगर येथे पोलीसांची कारवाई
MH 28 News Live, उदयनगर : अमडापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या उदयनगर येथे वरली मटका खेळ सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरुन अमडापूर पोलीसांनी शुक्रवार, दि. ३ जानेवारी रोजी छापा मारून सात जणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
सदर माहिती ठाणेदार नागेश कुमार चतरकर यांना गुप्त माहितीदाराकडून माहीती मिळताच पो. का. तडवी, गजानन राजपूत, राहुल जाधव, अमोल काकडे यांनी लपत छुपथ जावून वरली जुगारावर छापा मारून आरोपी गजानन श्रीराम बारगड ६१ वर्ष रा. उदयनगर प्रदीप नामदेव बिबे वय ५० वर्ष रा. तोरण वाडा, अमोल शिवाजी गायकवाड वय २३ वर्ष उदयनगर, शर्मासिंग कतारसिंग लिकडे वय ४५ वर्ष रा. नागझरी, उमेश रावसिंग बटवाडे वय २१ वर्ष रा. गेरू माटरगाव, राम मुरलीधर यादव वय ५० वर्ष वैरागड, प्रकाश राम ढोरे वय ४७ वर्ष रा. तोरण वाडा, यांना पकडले. त्यांच्या ताब्यातून सहा हजार ४७० रु. नगदी व वरली मटका साहित्य जप्त करून सातही आरोपी विरुद्ध मुंबई कलम १२ अँकटप्रमाणे कारवाई करून आरोपींना अटक केली आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button