
संस्कारक्षम शिक्षणाचे दालन म्हणजे समता किड्स इंग्लिश स्कूल – मंत्रालयीन अधिकारी विद्याधर महाले यांचे प्रतिपादन
MH 28 News Live, चिखली : समता किड्स इंग्लिश स्कूल चिखलीचे वार्षीक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले.लहान चिमुकल्या पावलांनी येणारा प्रत्येक आकार म्हणजे संस्कार – संस्कृती होय. नाविन्यपूर्ण शिक्षण क्षेत्रामध्ये उजाड माळराणा वरती ग्रामीण भागातील चिमुकल्यांसाठी अद्यावत शिक्षणाची उपलब्धता आजच्या काळात लवकर होत नाही येणाऱ्या भविष्याचे वेध लक्षात घेऊन समता किड्स स्कूलचे छोटेसे रोपटे समता महाविद्यालयाच्या रूपाने अबाधित व्हावे असे प्रतिपादन स्नेहसंमेलनाचे उद्घाटक मंत्रालयीन अधिकारी विद्याधर महाले यांनी केले.
यावेळी आपलं शिक्षण आपले भविष्य घडवीत असते त्याकरिता पालकांनी आपल्या पाल्याच्या कलागुणांना सुप्त संधी द्यावी असे विचार समता किड्स इंग्लिश स्कूल संस्थापक अध्यक्ष दत्ता खरात यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. यावेळी समता किड्स इंग्लिश स्कूलचा माजी विद्यार्थी रुद्र खरात याने शिवाजी महाराजांचा पोवाडा गावुन उपस्थितांची मने जिंकली.व्यासपीठावर राजे संभाजी अर्बनचे अध्यक्ष शिवराज पाटील,संगिताताई खरात,भाजपा तालुकाध्यक्ष कृष्णकुमार सपकाळ,पंजाबराव धनवे, माजी नगर सेवक सुदर्शन खरात, बाळासाहेबांची शिवसेना शहरप्रमुख विलास घोलप, माळी महासंघाचे विजय खरात, विनोद वनारे, प्रताप खरात, सागर खरात, भूषण खरात यांचेसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शासकीय कोठ्यातुन चंद्रपूर येथे MBBS साठी निवड झाल्याबद्दल दत्ता भाऊ खरात यांचा पुतण्या चि. प्रथमेश खरात यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
स्नेहसंम्मेलन यशस्वीतेसाठी शाळेचे उपाध्यक्ष योगेश राजे, सचिव शुभम खरात, मुख्याध्यापक मनोज भालेराव, भागवत फुलझाडे, प्रिती खराडे, शिला वाघमारे, सीमा भुसारी, शिवानी शेळके, संध्या पैठणकर, पूजा गाडेकर, यांनी परिश्रम घेतले. स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन गणेश धुंदळे व प्रिती खराडे यांनी केले तर आभार शिला वाघमारे यांनी मानले.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button