♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीस दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा

MH 28 News Live, खामगाव : अल्पवयीन : मुलीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीस दोन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. हा निकाल खामगाव न्यायालयातील दुसरे तदर्थ जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.पी. कुळकर्णी यांनी ८ फेब्रुवारी रोजी दिला.

शहरातील शोकत कॉलनी भागातील रहिवासी स.मोहसीन शेख माजीद उर्फ भुप्या (२६) हा जुना फेल भागात २३ मार्च २०१७ रोजी एका सोळा वर्षीय अल्पवयीन बालिकेच्या घरासमोर येऊन आपला मोबाईल स्वतःच्या कानाला लायत बालिका हिचे मनात लज्जा उत्पन्न होईल अशा वाईट उद्देशाने इशारे करत होता.

याबाबत बालिकेच्या आईने विचारणा केली असता भुन्याने तिच्या आईला धमकी दिली. या तक्रारीवरून आरोपी मोहसीन शेख माजिद उर्फ भुन्या याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश भालेराव यांनी केला. सदर गुन्ह्याचे तपासामध्ये आरोपी विरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने दोषारोपपत्र तयार करून खामगाव न्यायालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी ८ फेब्रुवारी रोजी खामगाव न्यायालयात सुनावणी करण्यात आली असता सरकारी अभियोक्ता यांनी सहा साक्षीदार तपासले. साक्षीदारांची साक्ष व शासकीय अभियोक्ता बसंत भटकर यांचा युक्तिवाद ग्राह धरत दुसरे तदर्थ जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.पी. कुळकर्णी यांनी आरोपी गोहसीन शेख माजिद उर्फ भुन्या याला दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129