♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; ग्रामस्थ आक्रमक. आर्थिक मदत देण्याची ग्वाही दिल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार

MH 28 News Live, मलकापूर : टिप्परच्या धडकेने दुचाकीस्वार एक ठार व एक जण जखमी झाल्याची घटना ९ फेब्रुवारी रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास घिर्णी- बेलाड रस्त्यावर घडली.

एम.पी.०९ एच. जे. ५०५५ या मालवाहतूक करणाऱ्या टिप्परने एच १४ डी ८९८४ या दुचाकीस जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार प्रदीप भरत निंबोळकर (वय २५ वर्ष) रा. बेलाड हा जागीच ठार झाला. तर गजानन त्रंबक संबारे (वय ३२ वर्ष) रा. बेलाड यांच्या हाताला इजा झाल्याने त्याला उपचारार्थ मलकापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर चालक अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला. तर संतप्त ग्रामस्थांकडून टिप्परच्या काचांची तोडफोड करण्यात आली. घटनेची माहिती कळताच मलकापूर शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. त्यानंतर १० फेब्रुवारी रोजी सकाळी अपघातातील मृतकाचे शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईक व ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेत थेट वडोदा फाट्यावरील कल्याण टोल कंपनीचे कार्यालय गाठले. जोपर्यंत मृतकाच्या परिवारास आर्थिक मदत मिळत नाही तोपर्यंत मृतदेह अंत्यविधी करिता न नेण्याची आक्रमक भूमिका घेतली.

दरम्यान आमदार राजेश एकडे, माजी नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष बंडू चौधरी, शहराध्यक्ष राजू पाटील यांनी कल्याण टोल कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करीत चालकाच्या चुकीमुळे घडलेल्या अपघातात त्या कुटुंबातील कर्ता पुरुष मृत पावल्याने याप्रकरणी सहानुभूती ठेवत योग्य ती मदत केलीच पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेतली. चर्चेदरम्यान कंपनीकडून आर्थिक मदत देण्याची ग्वाही देण्यात आल्याने वातावरण निवळले.

यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिनव त्यागी, पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यावेळी येथे दाखल झाले होते. तर कल्याण टोल इन्स्ट्रक्चर कंपनी समोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. वातावरण निवळल्यानंतर सदर मृतदेह अंत्यविधीकरिता नातेवाईक ग्रामस्थांकडून नेण्यात आला.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129