♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

जून उजाडला तरी शेगावात स्वस्त धान्य दुकानदारांना मिळाले नाही मे महिन्याचे धान्य, वाटप खोळंबले

MH 28 News Live, शेगाव : पुरवठा विभागाने शहरातील स्वस्त धान्य दुकानांना चालू मे महिन्याचे धान्य उपलब्ध करून देण्याची मागणी शहरातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने तहसीलदार समाधान सोनवणे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

शेगाव शहरात पुरवठा विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येणारे मे महिन्याचे धान्य आज ३० मे झाल्यानंतर सुद्धा अद्याप पर्यंतही उपलब्ध करून देण्यात न आल्यामुळे शेगाव शहरातील राशन दुकानदार व राशन कार्ड धारक यांच्यामध्ये वादावादी होऊन प्रकरण गंभीर स्वरूप देत आहे. या कारणामुळे स्वस्त धान्य दुकानदार अस्वस्थ झालेले असून स्वस्त धान्य दुकानदारांची मनस्थिती बिघडलेली आहे या बाबीचा गंभीरतेने विचार करून प्रशासनाने स्वस्त धान्य दुकानांना पुरवठा विभागाकडून आवश्‍यक धान्य पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. तहसीलदार समाधान सोनवणे यांना तहसील कार्यालयात दिलेल्या निवेदनावर बाबुराव वानखडे, विजय नामदास, संजय सोनोने, दीपक ढमाळ, गोपाल पल्हाडे, श्रीमती जी. जी. शेगोकार, आर एस ढगे, मो . ना. धनोकार, सोनू मोहोड आदींच्या सह्या आहेत.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129