♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार… मलकापुरात गॅस सिलेंडरसह ५. ७९ लाखांचा मुद्देमाल जप्त; आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

MH 28 News Live, मलकापूर : शहरासह तालुक्यात सुरू असलेल्या घरगुती गॅसच्या काळ्या बाजाराचा स्थानिक गुन्हे शाखेने टाकलेल्या छाप्यांत पर्दाफास झाला. एलसीबी च्या पथकाने १४ फेब्रुवारीरोजी मलकापूर येथील देवथाबा रोडवर टाकलेल्या छाप्यांत हा | काळाबाजार उघडकीस आला असून, गॅस सिलिंडरसह ५ लाख ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईत आरोपी प्रकाश दादाराव आढाव, रा. रोहिदास नगर मलकापूर आणि अन्य चार आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घरगुती गॅसचा अवैध वापर व वाहनांत चढ्यादराने भरण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. मलकापूर शहर व परिसरात याबाबतचे रॅकेटच सक्रीय आहे. याबाबतची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली असता, या पथकाने जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड, ने अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या आदेशाने १४ फेब्रुवारी रोजी पोलीस स्टेशन मलकापूर शहर हद्दीत छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपी प्रकाश दादाराव आढाव रा. रोहिदास नगर मलकापूर आणि . अन्य चार आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले. र या आरोपी कडून ३ ऑटो. एक होंडा सिटी कार, ५ मोटार कॉम्प्रेसर नळी नोझल, इलेक्ट्रीक काटा असा एकूण ५ लाख ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त न करण्यात आला. या आरोपीविरुद्ध कलम २८५, २८६ भादविसह कलम ३, ७ तसेच जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार (ईसी) कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई बुलडाणा गुन्हे शाखेच्या पथकातील एपीआय विलासकुमार सानप, एएसआय रामविजय राजपूत, राजकुमार राजपूत, गजानन दराडे, गणेश पाटील विजय वारुळे, गजानन गोरले, गणेश शेळके, चालक मधुकर रगड यांनी केली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129