चिखलीमध्ये भर दिवसा घरफोडी; रोख रक्कम व सोन्या चांदीच्या दागिन्यांसह सुमारे पाच लाखाचा ऐवज पळवला
MH 28 News Live, चिखली : घरात कुणीही नसल्याचे पाहून भर दिवसख दुपारी ११ ते १२ वाजे दरम्यान अज्ञात चोरट्याने एका घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि कपाटातील रोख रकमेसह सुमारे पाच लाखाचा मुद्देमाल पळवल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये सोन्या चांदीचे दागिने देखील होते. दि. २० फेब्रुवारी रोजी ही घटना चिखली शहरातील जुना भानखेड रस्ता शिवनगर परिसरात घडली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून दिवसाढवळ्या देखील लोकांचा मुद्देमाल सुरक्षित नसल्याची प्रतिक्रिया चिखलीकरांमध्ये उमटत आहे
सदर घटनेसंबंधी थोडक्यात हकीकत अशी की, चिखली शहराच्या दक्षिणेला असलेल्या जुना भानखेड रस्ता या परिसरात शिवनगर भागामध्ये अरुण अशोक कऱ्हाडे यांच्या घरी हा प्रकार घडला. जवळच असलेल्या भोकर येथे कऱ्हाडे यांचे फर्टीलायझरचे दुकान आहे. कऱ्हाडे पती-पत्नी सकाळी आठ वाजता आपल्या दुकानांमध्ये निघून गेले.
त्यांचा मुलगा अभिषेक हा देखील सकाळी ११ वाजता एका कार्यक्रमाला जाण्यासाठी घराबाहेर पडला. नेमकी हीच वेळ साधून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कऱ्हाडे यांच्या घरामध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या घराच्या एका खोलीत असलेल्या कपाटाचे देखील कुलूप या चोरट्याने तोडले.
कपाटातील रोख दोन ते अडीच लाख रुपये रक्कम आणि सोन्याचे पाच तोळ्याचे दागिने व चांदीचे आठ ते नऊ शिक्के घेऊन चोरटे पसार झाले अशी माहिती कऱ्हाडे कुटुंबियांनी MH 28 News Live ला दिली। या घटनेची तक्रार कऱ्हाडे यांनी चिखली पोलिसांमध्ये नोंदवली असून चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. वृत्त लिहीपर्यंत अद्याप नवीन माहिती हाती आलेली नाही.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button