
विद्युत महामंडळाचा गलथान कारभार वाकलेले खांब जीव गेल्यावर बदलणार काय ? संतप्त नागरिकांचा सवाल
MH 28 News Live, उदयनगर: लाखनवाडा रोडवर तसेच विदर्भ कोकण बँकेला लागून, ग्रामस्थ नागरिकांच्या रहदारीच्या मार्गावर वाकलेला विद्युत खांब याकडे उदयनगर विभागीय महावितरण कार्यालय व कंपनीचे अक्षरशः दुर्लक्ष होत असल्याने येथील नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे तसेच सदरील वाकलेला विद्युत खांब कधीही कोसळून पडेल याची शाश्वती देता येत नसल्याचे दिसत आहे .
सदरील विद्युत खांब हा जवळ जवळ एक वर्षापासुन विद्युत वहिन्यांसह वाकला असून डॉ कवडकार यांच्या दवाखान्यासमोर रस्त्यालगत लाईनचा विद्युत पुरवठा करणारा हा विद्युत पोल मागील एक वर्षापासून विद्युततारांसह वाकला आहे त्यामुळे हा खांब कधीही कोसळून मोठा आपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या महावितरण कंपनीच्या पोलावरुन जाणारी लाईन विद्युत पुरवठा करणारा विद्युत खांब कोसळला तर मोठा अनर्थ होऊ शकतो. हा वाकलेले विद्युत खांब रस्त्याच्या बाजुला आहे व रस्त्याने रोज शेकडो नागरीक ये जा करीत असतात अशा वेळी वाकलेले खांब कोसळला तर मोठा अनर्थ होऊ शकतो.तसेच आशा विद्युत खांबांवर कर्मचारी वर्गाने काम करणे धोकादायक ठरत आहे.
अशा घटना महाराष्ट्र विद्युत महामंडळ वितरक कंपनीला टाळायच्या असतील तर याचा गांभीर्याने विचार करूनअसे विद्युत खांब पावसाळ्यापूर्वी बदलण्यात यावे अशा घटनांमुळे लाख मोलाचा जिव गेल्यानंतर पंचनामा करण्यापेक्षा अशी कामे त्वरित केली का जात नाही ?असा खडा सवाल येथील नागरिकांकडुन केला जात आहे त्यामुळे हा विद्युत खांब ताबडतोब बदलणे आता गरजेचे झाले आहे.