
सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांसाठी मोठी बातमी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा
MH 28 News Live : राज्यातील सफाई कर्मचाऱ्यांठी महत्त्वाची बातमी आहे. सफाई कर्मचारी निवृत्त झाल्यावर वारसांना नोकरी मिळणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली आहे. मुदती आधी किंवा मुदतीनंतर सफाई कर्मचारी निवृत्त झाल्यास त्यांच्या वारसांना नोकरी मिळणार आहे. दरम्यान, सफाई कर्मचाऱ्याला स्वेच्छानिवृत्तीसाठी १५ वर्षे सेवा बंधनकारक असणार आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. यामध्ये शासकीय सेवेसह महानगरपालिका, नगरपालिका, महाविद्यालयातील सफाई कर्मचाऱ्यांचा यामध्ये सहभाग असणार आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button