
उदयनगरातील प्रस्तावित चौपदरीकरण रस्ता मंजूर करावा – ना. गडकरी यांच्याकडे मागणी
MH 28 News Live, उदयनगर : गावातून गेलेल्या जालना – खामगांव राष्ट्रीय महामार्गचे चौपदरी रस्ता काम अधीक्षक अभियंता रा. म. मंडळ नागपूर यांच्या कार्यालयाद्वारे प्रादेशिक अधिकारी राष्ट्रीय महामार्ग कार्यालय मुंबई कार्यालयात प्रस्तावित असलेल्या गावातील रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाला आगामी वार्षिक आराखड्यात समाविष्ट करून मंजुरात मिळावी करिता केन्द्रीय भूपृष्ठ परिवहन राजमार्ग मंत्री ना.नितिन गडकरी यांना रफ़ीक शेख यांनी केली. नागपूर येथे २६ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष भेट घेऊन गावकर्यांच्या वतीने आ. श्वेताताई महाले यांच्या मार्गदर्शनात निवेदनाद्वारे मागणी केली.
दिलेल्या निवेदनात नमूद असे की उदयनगर मार्गे जालना – खामगांव राष्ट्रीय महामार्गचे काम झालेले असून यामध्ये गावातून चौपदरीकरणाचे प्रस्तावित असलेले काम अध्याप पर्यंत झालेले नाही. याकरिता अनेक वेळा कार्यकारी अभियंता रा. म. विभाग अकोला यांना निवेदनाद्वारे अनेक वेळा मागणी करण्यात आली तसेच या करिता विविध पक्ष संघटनेच्या वतीने अनेक वेळा आंदोलने झाली, सर्व गावकऱ्यांच्या वतीने दि. २३ जून २०२२ रोजी गावातील सर्व दुकाने बंद ठेऊन उदयनगर चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन सुद्धा करण्यात आले होते. गावातून चौपदरीकरण व्हावे यासाठी दर वेळेस आंदोलनकर्त्याना संबधित अधिकाऱ्यांनी सदर काम प्रस्तावित असल्याचे लेखी पत्र देऊन वेळ मारून नेली आहे. गावातून अरुंद रस्ता असून चौपदरीकरण न झाल्यामुळे वाहन चालकाना त्रास होत आहे. अतिक्रमण न काढता कमी रुंदीच्या रस्त्यात दुभाजक टाकल्यामुळे सदर दुभाजकावर अनेक वाहने आदळून अपघात झाले आहे व होत आहेत तसेच सदर मार्गावर विद्यालय असल्यामुळे विद्यार्थ्यांना येण्या- जाण्याकरिता हाच एकमेव रस्ता आहे.
कमी रुंदीच्या रस्ता असल्यामुळे अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही गावातून रस्त्याचे काम होण्याअगोदर सर्व व्यापारी बांधवांनी आपल्या दुकानासमोरील स्वयंखुशीने अतिक्रम काढून दिले होते. तरी राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने सदर चौपदरीकरनाचे काम त्या वेळेस हेतू पुरस्पर करण्यात आले नाही असे वाटत आहे तसेच वाहन थांबण्यासाठी पुन्हा अतिक्रम झाल्यामुळे पुरेशी खुली जागा शिल्लक नसल्यामुळे येथे रोज ट्राफिक जाम होत आहे. रात्रीच्या वेळी वाहने भरधाव वेगाने जातात येतात यामुळे मोठे अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही या मार्गावर दोन प्राथमिक शाळा तीन माध्यमिक विद्यालय असून मंदिर ईदगाह, समशानभूमी, कब्रस्तान याच मार्गावर आहे. गावाला चाळीस ते पन्नास गावाची देवाण-घेवाण असल्यामुळे गावात नेहमी वर्दळ असते यामुळे गावात चौपदरीकरण होणे अत्यंत गरजेचे झाले आहे, तसेच पावसाळ्यात खामगाव रोडने चौफुलीजवळ दोन्ही बाजूने पाणी साचून तलावाचे स्वरूप येथे येत आहे. त्यामुळे वाहन चालकांना येणाऱ्या जाणाऱ्या नागरिक,शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, दुकानदारांना खूप त्रास होत आहे. याबाबत दखल घेणे गरजेचे झाले आहे उदयनगर गावातून जालना – खामगाव मार्गाचे सदर काम सुरू असताना चौपदरीकरण करण्याचे काम अपूर्ण सोडल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने उदयनगर वासियावर अन्याय झाला आहे. या गावातील कमी रुंदीच्या रस्त्यावर दुभाजक टाकून गावात वाहनांना उभे राहण्याकरिता शिल्लक जागा न राहल्यामुळे येथील व्यापाऱ्यांना मोठा फटका बसून व्यवसाय बुडाले आहे. तरी उदयनगरवासियावर गावाचा रस्ता विकास बाबतीत होत असलेला अन्याय दूर करावा व प्रस्तावित असलेल्या गावातील चौपदरीकरणाचे काम मंजूर करून आगामी वर्षी आराखड्यात समाविष्ट करण्यात यावा अशी विनंती माजी ग्रामपंचायत सदस्य रफ़ीक शेख यांनी केली आहे. या वेळी सोबत सचिन उनोने, विष्णू गाडेकर, अनिल अपूर्वा, प्रमोद कांडेकर उपस्थित होते.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button