♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी रामकृष्णदादा शेटे तर सचिव पदावर प्रेमराज भाला यांची फेरनिवड

MH 28 News Live, चिखली : जिल्ह्यातील नामांकित शिक्षण संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ चिखली या संस्थेच्या अध्यक्षपदी रामकृष्ण गोविंद राव शेटे यांची फेरनिवड करण्यात आली असून सचिवपदी प्रेमराज प्रभुलाल भाला यांची देखील फेरनिवड करण्यात आली आहे उर्वरित कार्यकारणी मधील बहुत आयुष्य पदाधिकारी यांनादेखील पुन्हा एकदा संधी मिळाली असून काही नवीन चेहऱ्याचा या कार्यकारणी मध्ये समावेश करण्यात आला आहे

रविवार दिनांक तीन एप्रिल रोजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या महत्त्वपूर्ण सभेचे आयोजन करण्यात आले होते संस्थेच्या नूतन कार्यकारिणीची रितसर निवड करण्यात आली नवीन कार्यकारणी मध्ये रामकृष्णदादा शेटे यांची अध्यक्षपदी तर प्रेमराज भाला यांची सचिवपदी फेरनिवड करण्यात आली संस्थेच्या उपाध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक नानासाहेब बाहेकर यांची निवड करण्यात आली याशिवाय संस्थेचे सचिव संस्थेचे सहसचिव म्हणून कैलास शेटे कोषाध्यक्षपदी एडवोकेट विजय कोठारी यांचीदेखील फेरनिवड करण्यात आली आहे माजी नगराध्यक्ष भाऊसाहेब लाहोटी सतिष गुप्ता रामदास निमावत विजय शेटे सहदेवराव सुरडकर आणि संतोष कबुतरे यांची संचालक पदावर निवड करण्यात आली आहे शिक्षण प्रसारक मंडळाच्या या नूतन कार्यकारिणीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129