
शेतकर्याचे सोयाबीन चोरणार्यांच्या आवळल्या स्था. गु. शा. ने मुसक्या
MH 28 News Live, धाड : येथून जवळच असलेल्या ग्राम धामणगाव येथील एका शेतकर्याचे घरासमोर वराड्यांत ठेवलेले सोयाबीनचे आठ कटटे अंदाजे ५ क्विटल सोयाबीन दि. २४ फेब्रुवारी रोजी चे रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्यावरून पोलीस ठाणे धाड येथे गुन्हयाची नोंद करण्यात आली होती.
पोलीस अधीक्षक बुलडाणा सारंग आवाड यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, बुलडाणा अशोक लांडे स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणा येथे कार्यवाहीकामी पथक नेमले होते. पथकाने गोपनिय तसेच तांत्रिक माहिती संकलित केली होती. सीसीटीव्ही फूटेज मध्ये एक पांढर्या रंगाची कूझर गाडी ही संशयास्पदरितीने मिळून आली होती. दि. २५ फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणा यांना गोपनीय माहिती मिळाली की, पांढर्या रंगाची कुझर कार हि रायपुर येथील असून पोलीसांनी सदरची गाडी रायपुर येथून जप्त केली. व सदर गाडीचा चालक विशाल तेजराव चिकटे रा. सिदखेड मातला व त्याचे दोन मित्र आरोपी शेख राजीक शेख इब्राहिम पवन महेंद्र खिल्लारे दोन्ही रा. रायपुर यांचा पाठलाग करून ताब्यात घेवून विचारपूस केली असता ग्राम धामनगाव येथील एका शेतकर्याचे घरासमोर वराड्यांत ठेवलेले सोयाबीनचे आठ कटटे अंदाजे ५ क्विटल सोयाबीन चोरुन नेले बाबत व एक मालवाहू अपेमध्ये लपवून ठेवले असल्याबाबत कबूली दिल्याने पंचासमक्ष सदरचा मुद्देमाल व गुन्हयात वापरलेली पांढर्या रंगाची कुझर कार व मालवाहु अँपे देखील जप्त करण्यात आली आहे.
गुन्हयात जप्त केलेला मुद्देमाल गुन्हयात चोरीस गेलेले ५ क्विटल सोयाबीनचे आठ कटटे, कुझर कार, अॅपे किंमत अंदाजे असा एकुण ९ लाख ७५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपी विशाल तेजराव चिकटे रा. सिंदखेड मातला, शेख राजीक शेख इब्राहिम, पवन महेंद्र खिल्लारे दोन्ही रा. रायपुर. यांच्याकडून दि. २५ फेब्रुवारी रोजी चोरीचा माल रायपूर येथून हस्तगत करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सारंग आवाड, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अशोक लांडे यांचे आदेशाने पोलीस अंमलदार सफी दशरथ जुमडे, पो.ना. जगदेव टेकाळे, पो.ना अनंत फरतळे, पो.ना. पुरुषोत्तम आघाव, पो. कॉ. मनोज खारडे व पो.कॉ कैलास ठोंबरे यांनी केली आहे.