
महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीच्या प्रयोगाची कुजबुज सुरू; ‘ मविआ ‘ साठी धोक्याची घंटा…
MH 28 News Live : आगामी २०२४ हे वर्ष निवडणुकांचं वर्ष आहे, त्यामुळे राज्यात एक वर्ष आधीच मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून चार ते पाच पक्ष शड्डू ठोकणार असल्याचं दिसतंय. मोठे पक्ष लहान पक्षांना गृहित धरून राजकारण करतायत, त्यामुळे आता लहान पक्षांनीसुद्धा प्रस्थापितांना अस्मान दाखवण्याची रणनीती आखल्याचं दिसतंय. या तिसऱ्या आघाडीच्या शक्यतूमुळे महाविकास आघाडीच्या समोर मात्र आणखी एक प्रतिस्पर्धी वाढणार असून मविआसाठी ही संभाव्य आघाडी धोक्याची घंटा ठरण्याची चिन्हे आहेत.
भाजप-शिवसेना युती आणि महाविकासआघाडीला पर्याय देण्यासाठी आता तिसऱ्या आघाडीचे पडघम पुन्हा एकदा वाजू लागले आहेत. राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना, महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष, शेतकरी कामगार पक्ष एकत्र येणार आहेत, त्यांच्या आघाडीत तेलंगणाचे मुख्यमंत्री केसी राव यांच्या भारत राष्ट्र समितीसह अन्यही काही पक्षांचा समावेश होण्याची शक्यता आहे. लवकरच याविषयीची घोषणा केली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटना, भाजप आणि महाविकास आघाडीसोबत काही काळ गेली होती. मात्र दोन्हीकडून त्यांचा अपेक्षाभंग झाल्याने राजू शेट्टी यांनी आता वेगळी भूमिका घेतली आहे. तर दुर्लक्ष केल्याने महादेव जानकर यांचा रासपसुद्धा भाजपपासून चार हात दूर आहे.
महाविकासआघाडी लक्ष देत नसल्यामुळे शेतकरी कामगार पक्षही नाराज आहे. मागच्या वर्षी 30 जूनला एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, यानंतर राज्यातली राजकीय समिकरणं बदलली आहेत. केंद्रात आणि राज्यात सरकार असल्याने प्रबळ असलेल्या भाजप-शिवसेनेला इतर पक्षांची गरज राहिलेली नाही. तर महाविकासआघाडीमध्ये आधीच तीन पक्ष आहेत. वंचित बहुजन आघाडीची सुद्धा महाविकासआघाडीमध्ये यायची चर्चा आहे, त्यामुळे छोट्या पक्षांनी सत्ताधारी आणि विरोधकांचा नाद सोडत स्वत:चच आव्हान तयार करण्याची तयारी सुरू केली आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button