♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

वाकदकर मारहाण प्रकरणातील आरोपी झाले ‘ भूमीगत ‘; माजी आमदार बोंद्रे आपल्या साथीदारांसह ‘ नाँट रिचेबल ‘

MH 28 News Live, चिखली : फेसबुकवर टाकलेल्या पोस्ट बद्दल काल श्याम वाकदकर यांना झालेल्या मारहाण प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात काल रात्री उशिरा गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर पोलीस प्रशासनाने हालचाली सुरू केल्या. दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्यासह अन्य ५ – ६ लोकांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली. मात्र सर्व आरोपी ‘ भूमीगत ‘ झाले असून यापैकीच एक असलेले माजी आमदार राहुल बोंद्रे देखील ‘ नाँट रिचेबल ‘ आहेत.

स्थानिक श्याम वाकदकर यांनी आपले वडील स्व. तात्यासाहेब बोंद्रे यांच्या विषयी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या कारणावरून माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्यासह शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अतहरोद्दिन काझी, माजी नगरसेविका पती विजय गाडेकर, कैलास जंगले आणि बोंद्रे यांचे पीए श्लोकानंद डांगे यांच्यासह १२ – १३ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या संदर्भात आरोपींना ताब्यात घेण्यासाठी चिखली पोलिस संबंधीतांच्या घरी पोहचले, मात्र यातील एकही जण पोलीसांच्या हाती लागला नाही. सदर आरोपी फरार झाले असून त्यांनी अटकपूर्व जामिनाची तयारी चालवली असल्याची माहिती आहे.

हल्लेखोरांनी गळ्यातील साखळी आणि पाच हजार रुपये लांबवले – श्याम वाकदकर

या प्रकरणातील फिर्यादी श्याम वाकदकर यांनी दिलेल्या बयानात माजी आमदार राहुल बोंद्रे व त्यांच्या सोबत मारहाण करण्यासाठी आलेल्या साथीदारांनी आपल्या गळ्यातील सोनसाखळी आणि खिशातील रोख पाच हजार रुपये लंपास केल्याचा आरोप केला असून त्या आधारे आरोपींवर भादंवि कलम ३९५, ३९७, ५०४ व ५०६ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129