संपकरी सरकारी कर्मचाऱ्यांच्या जागेवर सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीत घ्या – वरखेड ग्राम पंचायतचा ठराव, सरपंचांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
MH 28 News Live, चिखली : जुन्या पेंशनसाठी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे शासकीय सेवा विस्कळीत झाली असून विविध विभागांची कामे खोळंबली आहेत त्यामुळे संंपकरी कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांच्या जागेवर सुशिक्षित बेरोजगार युवकांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी करणारा ठराव तालुक्यातील वरखेड ग्राम पंचायतीने पारीत केला असून सरपंच विनोद कणखर यांनी अशी मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे.
नवी पेंशन योजना रद्द करून त्याऐवजी जुनी पेंशन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी दि. १४ मार्चपासून बेमुदत संपावर गेले आहेत. परिणामी विविध विभागातील कामे खोळंबली असून सर्वसामान्य जनतेला अनेक गैरसोयी सहन कराव्या लागत आहेत. गलेलठ्ठ पगार असून या पगारापोटी शासनाच्या तिजोरीवर भार पडत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून संपकरी कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्या जागांवर ५० टक्के पगारात काम करण्यास तयार असलेल्या सुशिक्षित बेरोजगार युवकांना शासकीय सेवेत रुजू करून घ्यावे अशी मागणी करणारा ठराव वरखेड ग्राम पंचायतने दि. १७ मार्च रोजी सर्वानुमते पारीत केला. ग्राम पंचायत सदस्य महादू रामभाऊ वाकोडे हे या ठरावाचे सूचक असून जया प्रमोद कणखर ह्या अनुमोदक आहेत. सरपंच विनोद किसनराव कणखर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मासिक सभेतील ठरावाच्या अनुषंगाने एक निवेदन सरपंच विनोद कणखर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे. सदर निवेदनात करण्यात आलेल्या वरील मागणीमुळे संपकरी शासकीय कर्मचाऱ्यांच्या विरोधात जनमानसात असलेला रोष समोर येत असल्याचे दिसून येत आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button