♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

“त्या” आँटो चालकाचा असाही प्रामाणिकपणा, सापडलेला मोबाईल केला परत

MH 28 News Live, चिखली : सध्याच्या स्वार्थी जगात बरेच जण पैसा,संपत्तीच्या साठी आडमार्गाचा वापर करताना दिसतात. मात्र, काही लोक मेहनत मजुरी करून आपली उपजिविका भागवतांना आपला नैतिक तोल ढळू देत नाही. त्याचाच हा बोलका वृत्तांत..

दैनंदिन प्रवासी वाहतूक करताना विशाल तायडे यांना राजा टाॅवर्स परिसरात शनिवारी सकाळी साडेदहा च्या सुमारास एम आय कंपनीचा अंदाजे बारा हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन सापडला असता त्यावर आलेल्या फोन कालच्या आधारे तो मोबाईल चिखली तालुक्यातील वरखेड येथील मोलमजुरी करणाऱ्या निंबाजी शेषराव निकाळजे यांचा असल्याची खातरजमा झाल्यावर विशाल तायडे यांनी तो निंबाजी निकाळजे यांच्या सुपूर्त केला. विशेष बाब म्हणजे, विशाल तायडे हे सायं दैनिक विदर्भ दर्पण येथे मुद्रण विभागात कार्यरत आहेत. आॅफिस वेळे व्यतिरिक्त ते आँटोरिक्षा चालवतात. त्यांच्या या प्रामाणिकपणा बदल सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129