♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लोणार पालिकेत विषय समित्या अविरोध काँग्रेसची वज्रमुठ कायम

MH 28 News Live, लोणार : नगर पालिकेत दि. २९ मार्च रोजी विषय समितीची निवड करण्यात आली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी मेहकर गणेश राठोड, तहसीलदार सैफन नदाफ हे होते.

जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे सरचिटणीस श्याम उमाळकर, माजी जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणराव घुमरे, नगराध्यक्ष पुनम पाटोळे, गटनेते भूषण मापारी यांच्या मार्गदर्शनाखाली. सर्व समावेशक विषय समितीची अविरोध निवडणूक पार पडली. दि. २९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता नामनिर्देशन पत्र सादर करण्यात आले होते यावेळी प्रत्येक जागेसाठी एक अर्ज प्राप्त झाला त्यानुसार दोन वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विषय समितीची निवडणूक अविरोध झाल्याचे जाहीर केले. यावेळी बांधकाम सभापती रंजना मापारी, पाणीपुरवठा जलनिस्सारण सभापती ज्योत्स्ना गुलाबराव सरदार, फर्जना शेख रऊफ आरोग्य व स्वच्छता सभापती, वत्सला जगदीश खरात महिला व बालकल्याण सभापती, नूर महंमद खान ताजमिर खान शिक्षण सभापती यांची एक मताने निवड करण्यात आली यावेळी संतोष मापारी नगरसेवक आबेद खान मोमीन खान, नसीब बानो तोफिक कुरेशी, जुबेदाबी रमजान परसुवाले, पूजा सतीश राठोड, हे नगरसेवक हजर होते नगरपालिकेच्या मुख्याधिकारी विभा वराडे, कैलास नेवरे ,अशोक निचंग, गजानन बाजड हे कर्मचारी हजर होते.

या कार्यक्रमासाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेश मापारी, शहराध्यक्ष शेख समद शेख अहमद, ज्येष्ठ नेते साहेबराव पाटोळे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्रा. गजानन खरात, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिकेत मापारी, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष तोफिक कुरेशी, प्रदीप संचेती, ओबीसी सेल शहराध्यक्ष अंबादास इंगळे, पंढरी चाटे, ज्येष्ठ नेते दौलतराव मानकर, गुलाबराव सरदार, मनीष पाटोळे, रमजान परसुवाले, रऊफ भाई हजर होते.

अखेर काँग्रेस एकसंघ

मागील काही दिवसात काँग्रेसचे काही नगरसेवक शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करण्याच्या वावड्या उठल्या होत्या, मात्र काँग्रेसचे गटनेते भूषण मापारी, नगराध्यक्ष पूनम पाटोळे यांनी चोख भूमिका बजावत काँग्रेस एक संघ ठेवण्यास मोलाची भूमिका बजावली. काँग्रेसची वज्रमूठ कायम असल्याचे या निवडणुकीत अधिरेखित झाले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129