
चिखली बाजार समितीच्या रणमैदानात १८ जागांवर होणार ५० उमेदवारांमध्ये झूंज. महाविकास आघाडीला मिळाले विमान, भाजप पॅनलला कप बशी तर मनसेच्या पॅनलला मिळाले नारळ चिन्ह
MH 28 News Live, चिखली : चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत २० एप्रिलला संपली. त्यानंतर येथील निवडणूक रिंगणात ५० उमेदवार उरले आहेत. ग्रामपंचायत ( अनु. जाती / जमाती प्रवर्ग ), ग्रामपंचायत ( आर्थिक दुर्बल घटक ), ग्रामपंचायत ( सर्वसाधारण ), अडते व्यापारी गट, सहकारी संस्था ( ओबीसी प्रवर्ग ), महिला राखीव, विजा / भजा / विमा प्रवर्ग, हमाल – मापारी गट आणि सर्वसाधारण प्रवर्ग या सर्व मतदारसंघांमधून संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी हे उमेदवार २८ एप्रिल रोजी मतदारांना कौल मागणार आहेत.
सदर निवडणुकीसाठी २४२ उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले होते. यापैकी दोन सेटमध्ये सादर केलेले १४, अपात्र २५, मागे घेतलेले १५३ अर्ज वगळून १८ जागांसाठी एकूण ५० उमेदवारी अर्ज कायम राहिले आहेत. दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर उरलेल्या तीन पँनलमधील उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विमान हे चिन्ह मिळाले असून भारतीय जनता पक्षाच्या पॅनलला कप बशी तर मनसेच्या पॅनलला नारळ चिन्ह देण्यात आले आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी कृषी उत्पन्न बाजार समिती चिखली यांनी निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली असून यामध्ये ग्रामपंचायत सवर्गातून ४ जागांसाठी १३ अर्ज,सहकारी संस्थासाठी ११ जागांसाठी २७ अर्ज,व्यापारी व अडते या २ जागेसाठी ६ अर्ज,
हमाल व मापारी या एका जागेसाठी ४ अर्ज असे ऐकून ५० उमेदवार रिंगणात परस्परांविरोधात उभे आहेत.
ही आहे उमेदवारांची अंतिम यादी
ग्रामपंचायत गट (अनु जाती/ जमाती प्रवर्ग राखीव) –
संजय सुखदेव गवई, शोभा अंकुश पैठणे, कैलास शेषराव बोर्डे, गौतम किसन मघाडे. ग्रामपंचायत (आर्थिक दुर्बल घटक राखीव) पुरुषोत्तम वामनराव पडघान, समाधान सुखदेव परिहार, सतीश अमरसिंग सुरडकर. ग्रामपंचायत (सर्वसाधारण) विनोद भास्कर खरपास, रामेश्वर शिवशंकर खेडेकर, सुनील तेजराव चिंचोले, सुभाष सिताराम ठेग, रामेश्वर अंबादास लहाने, मनोज सारंगधर लाहुडकर. व्यापारी व अडते मतदारसंघ – मयूर राजेंद्र अग्रवाल, संतोष वामनआप्पा खबुतरे, नीरज जगदीश चौधरी, आनंद पुरुषोत्तमआप्पा बोंद्रे, जय सुभाष आप्पा बोंद्रे, कैलास हरिराम भादुपोता (शर्मा) सहकारी संस्था – (इतर मागास प्रवर्ग राखीव) प्रकाश नारायण चिचोले, संतोष रमेश वानखेडे (महिला राखीव) ज्योत्सना समाधान कणखर, कमल विष्णु कुळसुंदर, मंदाबाई शेनफड भुतेकर, ज्योत्सना लक्ष्मण शेळके (विजा/भज/विमा प्रवर्ग राखीव) रामेश्वर श्रीपत जाधव, श्रीकृष्ण समाधान साळोक (सर्वसाधारण) नितिन रंगनाथ इंगळे, संजय गणपत कऱ्हाडे, पंजाबराव गुलाबराव जावळे, प्रशांत पुरुषोत्तम ढोरे,गणेश पुंजाजी थुट्टे, पंजाबराव रामराव धनवे, श्रीकिसन तेजराव धोंडगे, शिवनारायण ज्ञानबा नखोद, भगवान सखाराम पवार, पांडुरंग बाजीराव भुतेकर, श्रीकृष्ण सुभाष मिसाळ, सुधाकर उत्तमराव मोरे, दीपक संतोषराव म्हस्के, गोपिनाथ बद्रीनारायण लहाने, विलास सोनाजी वसु, संतोष शिवाजी वाकडे, विनायक रामभाऊ सरनाईक, राजु भगवान सावळे, समाधान गोविंदा सुपेकर. हमाल मापारी मतदारसंघ – गणेश सुखदेव कांबळे, राजेश गजानन पवार, गोविंदा माणिकराव भिसे, अकबरखान रहेमानखान