
आज जिल्ह्यात दोघांनी गळफास लावून केली आत्महत्या. जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा येथे एक युवक तर बुलडाण्यातील लिपिकाने संपवले जीवन
MH 28 News Live, बुलडाणा : दोन दिवस चाललेला होळी व धुलीवंदनाचा उत्साह मावळतो न् मावळतो तोच आज जिल्ह्यामध्ये दोन आत्महत्या घडल्या. खाटावर आणि घाटाखाली अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये घडलेल्या या आत्महत्यांमध्ये दोन तरुणांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली संपवली. या घटनांमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत थोडक्यात माहिती अशी की, जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा येथे राहणारा भूषण जाधव याचे बी.टेक अग्रिकल्चरचे शिक्षण झालेले असून तो चिखली येथील कोठारी कंपनीत कामाला होता. तो दिनांक १७ मार्च रोजी होळी व धुलिवंदन सणानिमित्त खेर्डा येथील त्याच्या घरी आला होता. परंतु भूषण याने दिनांक १९ मार्च रोजी घरी कोणीही नसताना घरातील स्लॅपच्या लोखंडी कडीला दोराच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. भूषण यांने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच त्याचा लहान भाऊ हरीश जाधव व आशिष जाधव यांच्यासह रवींद्र भोपळे यांनी भूषणला खाली घेत प्रवीण वैष्णव यांच्या ऑटोमधून जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालय गाठले असता डॉक्टरांनी भूषण जाधव याला मृत घोषित केले.

मयत भूषणचे वडील गणेश तुळशीराम जाधव यांनी दिली जळगाव जामोद पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. भूषणने आत्महत्या का केली याचे कारण कळू शकले नाही. जळगाव जामोद पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
दुसऱ्या एका घटनेत बुलडाण्यातील रामनगर परिसरातील संजय नारायण जाधव (४७ ) यांनी बुलडाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील एका झाडाला पहाटे पहाटेच फाशी घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. मयत सजय जाधव हे बुलडाणा अर्बन पतसंस्थेच्या मुख्यालयात लिपिक पदावर कार्यरत होते. संजय जाधव यांच्या आत्महत्येचे कारण देखील अद्याप कळू शकले नाही. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुले आहेत. तपास सहायक पोलीस निरिक्षक अभिजीत अहिरराव करत आहेत.



