♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

अवैध हातभट्टीवर कार्यवाही, एक लाखाचा मुद्देमाल जप्त

MH 28 News Live, राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी, दि. 25 एप्रिल रोजी अवैध हातभट्टीवर कार्यवाही केली. या विशेष मोहिमेत ९ वारस गुन्हे नोंदवून ९ आरोपींसह हातभट्टी ७९ लिटर, रसायन २ हजार ८८९ लिटर, देशी मद्य ४४.८, विदेशी मद्य २.८८, असा १ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर कारवाई निरीक्षक के. आर. पाटील, आर. आर. उरकुडे, दुय्यम निरीक्षक आर. एम. माकोडे, ए. आर. आडळकर, जवान अमोल तिवाने, अमोल सोळंकी, पी. एच. पिंपळे, नितीन सोळंके, मोहन जाधव, सहायक दुय्यम निरीक्षक निलेश देशमुख यांनी सहभाग घेतला.

राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १ एप्रिल २०२३ ते दि. २६ एप्रिल २०२३ या कालावधीत एकूण ९४ गुन्हे नोंदवून ९० वारस गुन्ह्यासह ८९ आरोपी आणि ५ वाहनासह बिअर ८७ लिटर, देशी मद्य ३८५ लिटर, हातभट्टी ७५० लिटर, विदेशी मद्य १३७ लिटर आणि सडवा १८ हजार ४१ लिटर असा ११ लाख ६२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अवैध मद्य विक्री करणारे संतोष दगडु भोसले यांच्या मालकीच्या हॉटेल वैभव, मौजे रायपूर याच्यावर, तसेच अवैध मद्यसेवन करणाऱ्या ग्राहकांवर म. दा. का. १९४९ चे कलम ६८ व ८४ नुसार कार्यवाही करण्यात आली. जिल्ह्यातील नागरीकांनी मद्यसेवन परवाना प्राप्त करुन केवळ शासनमान्य अबकारी मद्य विक्री अनुज्ञप्त्यांमधूनच मद्य खरेदी आणि सेवन करावे. तसेच आपल्या परिसरात अवैध मद्य विक्री अथवा बनावट मद्य निर्मिती आढळल्यास विभागास टोल फ्री क्रमांक १८००८३३३३३ वर किंवा व्हॉटॲप क्रमांक ८४२२००११३३ वर किंवा excisesuvidha.mahaonline.gov.in या पोर्टलवर तात्काळ माहिती द्यावी.

जिल्ह्यातील किरकोळ व ठोक मद्य अनुज्ञाप्तीधारक यांच्या अनुज्ञाप्तीमध्ये बनावट मद्य आढळुन आल्यास त्यांची अनुज्ञाप्ती कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल. तसेच मद्य बाळगताना मद्य सेवन, मद्य वाहतूक करताना अथवा मद्य विक्री करताना किंवा आपल्या जागेचा वापर अवैध ढाबा चालविण्यासाठी दिल्यास त्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी कळविले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129