♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात; दोघांचा होरपळून मृत्यू, एक अत्यवस्थ

MH 28 News Live, बुलढाणा : समृद्धी महामार्गावर होणारे अपघात थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आता बुलडाणा येथे भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. देऊळगाव कोळ या गावाजवळ कारला अपघात झाला. त्यानंतर गाडीने पेट घेतल्याने दोन जणांचा होरपळुन मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. ही कार नागपूर शिर्डीला निघाली होती.

कसा झाला अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरवरुन काही जण बुलडाणाच्या दिशेने प्रवास करत होते. समृद्धी महामार्गावरुन जाताना बुलडाण्यातील देऊळगाव कोळ या गावाजवळ कारला अपघात झाला. कारला अपघात होऊन ती सुरुवातीला इम्पॅक्ट बॅरियरला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की धडकेनंतर कारला आग लागली. या आगीत होरपळून कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला.

मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही

अपघात इतका भीषण होता की मृतांचे ओळख पटवणं कठीण झालं आहे. आगीत कारमधील दोघांचा होरपळून मृत्यू झाल्याने त्यांच्या मृतदेहाची ओळखही पटवता येत नाही आहे. या प्रकरणी पोलीस आता तपास करत आहेत. अपघात इतका भीषण होता आगीत कार जळून खाक झाल्याने ती कुठली होती आणि त्यात कोणते प्रवासी होते? याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. अपघातातील जखमीवर दुसरबीड रुग्णालयात उपचार सुरू आहे. या अपघातामुळे, समृद्धी महामार्गावरील मुंबई कॉरिडोरवरची वाहतूक काही वेळ थांबवण्यात आली होती.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129