♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

आ. श्वेताताई महाले यांच्या पुढाकारातून मिळणार ऐतिहासिक क्षणाला उजाळा… शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या स्मृतीदिनानिमित्त वर्षभर राबवणार आगळेवेगळे अभियान; २ जून रोजी शुभारंभ

MH 28 News Live, चिखली : ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ म्हणजे ६ जून १६७४ या दिवशी महाराजांचा राज्याभिषेक झाला. देवगिरीचं साम्राज्य उध्वस्त झाल्यानंतर स्वतःच अस्तित्व विसरलेल्या हिंदुस्थानात प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा हिंदूंचं ३२ मनाचं सुवर्ण सिंहासन किल्ले श्री रायगडावर प्रस्थापित झालं. केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर साऱ्या हिंदुस्तानच्या दृष्टीने ही एक असाधारण गोष्ट होती, एक सुवर्णक्षण होता. या सोहळ्यासाठी सप्तसिंधू व सप्तगंगांचे पाणी तीर्थ म्हणून रायगडावर आणण्यात आले आणि तेथील तलावात समर्पित करून त्याचं गंगासागर हे नाव देण्यात आले. सन २०२३-२०२४ या वर्षात शिवराज्याभिषेक शक ३५० हे येत आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ही तिथी चालू वर्षात २ जून रोजी येत असून २०२४ मध्ये ही तिथी २० जून रोजी येत आहे. या अनुषंगाने आ. श्वेताताई महाले यांच्या पुढाकारातून दि. २ जून २०२३ पासून २० जून २०२४ या काळात शिवराज्यभिषेक महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.


शिवराज्याभिषेक सोहळ्याचे हे ३५० वे वर्ष हिंदू साम्राज्य दिन म्हणून महाराष्ट्र सरकार साजरे करत आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे कृतज्ञ स्मरण करणे, त्यांच्या असाधारण कर्तुत्वाचा जागर करणे, त्यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेतून सत्कार्याची वाट उजळणे या उद्देशाने हे अभियान हाती घेण्यात आले आहे. शिवराज्यभिषेक महोत्सवाच्या अनुषंगाने रायगडाच्या ज्या पवित्रतम् मातीने हा सोहळा पाहिला, अनुभवला त्या शिवतीर्थ रायगडावरील माती व राज्याभिषेकासाठी आणलेल्या सर्व तीर्थाने पवित्र झालेले गंगासागर तलावातील कलश रूपाने आ. श्वेताताई महाले यांनी स्वतः जाऊन आणला असून चिखली विधानसभा मतदारसंघातील गावोगावी असे कलश स्थानिक कार्यकर्त्यांकडे सोपवले जाणार आहेत.

असे आहे अभियान…

३५० वा येणारा राज्याभिषेक सोहळा आजच्या पिढीसाठी सुवर्णक्षण आहे. आ. महाले यांच्या कार्यालयातून रायगडाच्या पवित्र मातीचा व तेथील जलाचा कलश सन्मानपूर्वक आपल्या गावामध्ये घेऊन जावा. या २ जून ते २० जून या सप्ताहामध्ये वारकरी संप्रदाय, धारकरी, शिवप्रेमी युवा आणि महिला मंडळींनी ग्रामदेवतेसारखी मिरवणूक काढावी. माता भगिनींनी सदर मिरवणूक आपल्या दारावरुन जात असताना रांगोळ्या काढून या पवित्र कलशाचे पूजन करावे. या सोहळ्याची सांगता शिवचरित्रकार किंवा व्याख्याते यांच्या व्याख्यानाने करावी. आपणास देण्यात येणारा कलश दरवर्षीच्या जयंतीकरिता शिवस्मारक किंवा ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये नित्य पूजनासाठी सन्मानपूर्वक कायम जतन करून ठेवावा. असे आवाहन आ. श्वेताताई महाले यांनी या संदर्भात चिखली मतदारसंघातील समस्त शिवप्रेमी जनतेला केले आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129