
अबब… sss देऊळगाव माळी येथे एकाच रात्री दहा घरफोड्या; पंचक्रोशीतील उडाली खळबळ…
MH 28 News Live, चिखली : देऊळगाव माळी तालुका मेहकर येथे एकाच रात्री 10 घरी अज्ञात चोरट्यांनी फोडून पोबारा केला आहे. सविस्तर वृत असे की, देऊळगाव माळी येथे दिनांक २ जूनच्या रात्री सुमारे दोन ते साडेतीन वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद नऊ घरावर दरोडा टाकला पण, चोरट्यांना खाली हातानेच परतावे लागले. या अघटित प्रकारामुळे पंचक्रोशीतील खळबळ उडाली आहे.
देऊळगाव माळी येथील रहिवासी गणेश गाभणे (पोलीस), हरी नारायण मगर, भगवान काशिनाथ मगर, यांच्या घरी मात्र एक लाखापर्यंत चोरी झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.स्वप्निल गाभणे, डॉ. दत्तात्रय सुरूशे, डॉ.बद्री मगर, उद्धव गिरे, दिनेश आप्रे, पांडुरंग संस्थानचे कार्यालय, अशा दहा ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरावर दरोडा टाकला आहे. पण चोरट्यांच्या हातात फक्त एकाच ठिकाणी रक्कम किंवा दाग दागिने लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. सदर घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अलमदार अशोक मस्के, रामेश्वर रिंढे, जायभाये, हे सकाळी घटनास्थळावर दाखल होऊन पंचनामा केला. परत काही सुगाव लागतो का ? यासाठी गावातील काही ठिकाणची सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहे.