
सैलानीबाबांच्या दर्शनासाठी येणारे वाहन उलटले; २० भाविक जखमी
MH 28 News Live, बुलढाणा : तालुक्यातील पिंपळगाव सराई येथील सैलानी बाबांच्या दर्ग्यावर नवस फेडण्यासाठी येणाऱ्या भाविकांचे दि. १ जून रोजी दुपारी ३ च्या सुमारास वाहन उलटून अपघात झाला. झालेल्या अपघातात २० प्रवासी जखमी झाले. यातील गंभीर जखमींना बुलढाणा जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
जखमी जालना जिल्ह्यातील काठोरा बाजार येथील राहिवासी आहेत. टाटा ४०७ या वाहनाने ते सैलानीकडे येथे येत असताना बुलडाणा तालुक्यातील ढासाळवाडी जवळच्या वळणावर वाहन उलटले. जखमींमध्ये प्रामुख्याने महिला आणि बालकांचा समावेश आहे. जखमींना ढासाळवाडी ग्रामस्थ व रायपूर पोलिसांनी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले