आ. श्वेताताई महाले यांच्या पुढाकाराने खुला झाला रस्ता; गांगलगाव येथील उपोषण सुटले; तहसीलदार कव्हळे यांची उपस्थिती
MH 28 News Live, चिखली : गांगलगाव ते कोलारा मुख्य रस्त्याला लागून असलेला सरकारी नकाशावर पूर्वेकडील खैरव पाचशे मीटर रस्ता आणि पश्चिमेकडील रोहडा गावाकडे जाणारा पाचशे फूट शेत रस्ता खुला करण्यासाठी शेतकऱ्यांनी गेल्या सहा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणाची प्रशासनाने दखल न घेतल्याने उपोषण मंडपातील दोन जणांची प्रकृती चांगलीच बिघडली आणि त्यांना तात्काळ बुलढाणा येथे हालविन्यात आले होते. याची माहिती आ. महाले व तहसिलदार कव्हळे यांना मिळताच त्यांनी तात्काळ उपोषणाला भेट दिली. उपोषणकर्ते व गावकऱ्यांशी चर्चा करून हा वाद सामंजस्याने सोडवून सदर वादग्रस्त रस्ता खुला केला; त्यामुळे उपोषणकर्त्यानी आपले उपोषण मागे घेतले.
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गांगलगाव येथील शिवाजी त्रंबक म्हस्के व इतर शेतकऱ्यांची शेकडो एकर शेती पश्चिमेला रोहडा शिवारात गट क्र. १५९, २६४, १६५ मध्ये आहे. त्यामुळे या गटातील सर्व शेतकरी पूर्वी पासून जुन्याच शेत रस्त्याने ये – जा करुन जमिनीची वहीती करत होते. तत्कालीन तहसीलदार सुरेश बगळे यांच्या कारिर्दीत शेतकऱ्यांनी लोकर्गणीतून शेत रस्त्याचे काम केले होते, मात्र शेजारच्या १७ शेतकऱ्यांनी पाचशे मीटर रस्ता अडवून टाकला असे उपोषणकर्त्यांचे म्हणणे होते. तसेच पूर्वे कडील खैरव गावाकडे जाणाऱ्या शेत रस्त्याला लागून गट क्र. १२२, १२३, १२४, १२५ ,१२६, १२७,:१२८, १२९ यामध्ये शेतकरी बालू साहेबराव सावळे, राजेंद्र प्रल्हाद साळवे, संतोष विश्वास साळवे , शिवाजी दामोधर साळवे , गणेश निबोने , सुनिल म्हस्के अशा अनेक शेतकऱ्याच्या शेकडो शेत जमिनी आहेत. आधी हे शेतकरी रस्त्याअभावी गावालगतच्या नदीपात्रातून वाहत्या नाल्यातून ये – जा करीत जमिनीची मशागत करत होते. मात्र यावर्षी कोलारा ते गांगलगाव रोडवर नवीन उंच पुलाचे बांधकाम झाल्यानें पुर्वीचा पर्यायी रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे सरकारी नकाशाप्रमाणे असलेल्या मुख्य रस्त्यावरील पूर्वेकडील खैरव आणि पश्चिमेकडील रोहडा शेत रस्ता खुला करण्यासाठीं शिवाजी त्रंबक म्हस्के, सौ बेबीताई शिवाजी म्हस्के, सौ निर्मला उत्तम म्हस्के , शेनफड आनंदा सोळंकी हे २९ मे पासून मुख्य रस्त्यावर आमरण उपोषणाला बसले होते. त्यामध्ये दोन जणांची प्रकृती चांगलीच बिघडल्याने त्याना बुलढाणा येथे हलवण्यात आले होते. या घटनेची माहिती आ. श्वेताताई महाले आणि तहसीलदार सुरेश कव्हळे यांना मिळताच तात्काळ त्यांनी ताबडतोब उपोषणस्थळी धाव घेतली. उपोषणकर्ते व शेतमालक यांच्यातील वाद आपसात सामंजस्याने मिटवून हा रस्ता खुला केला. त्यामुळे उपोषणकर्त्यानी आपले आमरण मागे घेतले.
यावेळी शिवाजी म्हस्के, शेनफड सोळंकी, निर्मला बाई म्हस्के, बेबी बाई म्हस्के , साहेबराव म्हस्के , विष्णु सोळंकी, प्रल्हाद म्हस्के, रमेश म्हस्के, प्रकाश म्हस्के , वसंता सावळे , संजय सावळे , अनिल सावळे , मदनराव म्हस्के , नितीन म्हस्के सरपंच, गजेंद्र म्हस्के तालुका सरचिटणीस युवा मोर्चा, भिकाजी पाटील, बाळू जाधव, विजय पाटील, दत्तात्रय अंभोरे, संजय गायकवाड , बी. एस. म्हस्के, समाधान सावळे , गजानन सावळे , तानाजी म्हस्के, शिवाजी शेळके, वासत राव म्हस्के , दत्ता सावळे, मंगल बाई सोलंकी, लक्षण म्हस्के, संतोष सावळे आदी गावकरी उपस्थीत होते.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button