डोणगाव ते शेलगाव देशमुख एसटी बस सुरू करा – गावकऱ्यांची मागणी
MH 28 News Live, मेहकर : तालुक्यातील शेलगाव देशमुख येथे गेल्या 20 ते 25 दिवसापासून एसटी बस सेवा बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत आहेत. डोणगाव ते शेलगाव देशमुख एसटी बस सेवा सुरू करण्यासाठी दि. 20 जून रोजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्यावतीने आगार व्यवस्थापक मेहकर यांना निवेदन देण्यात आले असून ४ दिवसांत एसटी बस सुरू करावी अन्यथा २६ जून रोजी ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांच्या वतीने मेहकर शहरातील इंद्रप्रस्थ चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदनाच्या प्रतीलिपी खा. प्रतापराव जाधव, आ. डॉ संजय रायमुलकर व ठाणेदार पोलीस स्टेशन मेहकर यांना देण्यात आल्या आहेत. यावेळी सरपंचपती विनोद ताकतोडे,युवा सेना तालुका उपप्रमुख एकनाथ खराट, राष्ट्रवादीचे नेते गफ्फार शहा, माजी उपसरपंच विलास कड्डक, दशरथ सदार, गजानन म्हस्के, पत्रकार विष्णू आखरे, खंडू सदार, रामेश्वर सदार, युवा नेते पीयुष केळे, संतोष पोफळे, भिमराव सदार, उत्तम आखरे, विनोद कड्डक यांच्यासह शेलगाव देशमुख येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button