अज्ञाताने जाळले शेतातलै स्प्रिंकलर पाईप; 90 हजाराचे नुकसान; मेहकर तालुक्यातील प्रकार
MH 28 News Live, मेहकर : तालुक्यातील गोहोगाव दांदडे येथील महिला शेतकरी रेखा भाऊराव दांदडे या महिलेने पोलीस स्टेशनला फिर्यादी दिली की पांगरखेड शिवारात 4 एक्कर शेती असून शेतामध्ये गोठ्याच्या जवळ जैन कंपनीचे 90 स्पिंकलर पाईप ठेवलेले होते 20 जून रोजी शेतात पाहणे केली असता पाईप व्यवस्थित ठेवलेले होते मात्र, आज 21 जून रोजी शेताशेजारील शेतकऱ्यांनी फोनवरून माहिती दिली की तुमच्या शेतातील पाईपला आग लागली तेव्हा शेतात जाऊन पाहणी केली असता गोठ्या जवळ ठेवलेले जैन कंपनीचे 90 स्पिंकलरचे पाईप जळताना दिसून आले.
शेतीच्या आजूबाजूची पाहणी केली असता अज्ञात व्यक्तीने स्पिंकलरच्या पाईपला आग लावून 90 हजार रुपयाचे नुकसान केले महिलेने दिलेले फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्ध डोणगाव पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 148/ 2023 कलम 435 भादवी नुसार गुन्हा दाखल केला आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button