पश्चिम विदर्भातील मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतली अमित ठाकरे यांची भेट
MH 28 News Live, चिखली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पश्चिम विदर्भातील नेत्यांनी मनसे नेते तथा विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे यांची पश्चिम विदर्भातील संंपर्क अध्यक्ष व राज्य उपाध्यक्ष विठ्ठलराव लोखंडकार, सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे, विद्यार्थी संपर्क अध्यक्ष चेतन पेडणेकर, संतोष गांगुर्डे, महेश ओवे व बुलढाणा जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, अकोला जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, राजेश काळे वाशिम जिल्हाध्यक्ष राजु कडसे पाटील, यवतमाळ जिल्हाध्यक्ष मनीष डांगे, देवा शिवरामवार, अमरावती उपजिल्हा अध्यक्ष ओम पांडे यांनी सदिच्छा भेट घेतली.
यावेळी संजय पळसकार यांची सहकार नवनिर्माण सेना राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. पश्चिम विदर्भात आपण लवकरच यावे असे निमंत्रण सुध्दा देण्यात आले. अमित ठाकरे यांनी सुध्दा विनंतीला मान देत निमंत्रण स्विकारले व सर्व जिल्हाध्यक्ष यांना शेतकरी व विध्यार्थी, कामगार व जनसामान्यांपर्यंत जाऊन जनतेचे प्रश्नावर काम करा अशा सुचना केल्या व सर्वाना शुभेच्छा दिल्या. आपआपल्या जिल्ह्यांतील नवीन विद्यार्थी व तरुणांनी पक्षात काम करावे त्यांना सुध्दा संधी उपलब्ध करून द्यावी असे सुचवले.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button