
शिक्षकाचे विद्यार्थ्याशी अनैसर्गिक कृत्य; पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
MH 28 News Live, जळगाव जामोद ( अमोल भगत ) : तालुक्यातील धानोरा महासिद्ध येथे जिल्हा परिषद शाळेतील तिसऱ्या वर्गाच्या शिक्षकाने वर्गातील विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
जळगाव जामोद पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या धानोरा महासिद्ध येथे जिल्हा परिषद शाळेत शाळेवर कार्यरत असलेले शिक्षक जावेदोद्दीन नसीमुद्दीन पटेल वय 36 वर्ष ह्या शिक्षकाने दिनांक 7 जुलै 2023 रोजी आपल्या वर्गात शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याला वाचन करण्याच्या बहाण्याने बोलावले. त्या विद्यार्थ्याचं छळ करून त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचं उघडकीस आले. पीडित विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांनी जळगाव पोलीस ठाण्याकडे धाव घेतली व घडलेला प्रकार ठाणेदार यांच्यासमोर सांगितला. पीडित विद्यार्थी हा शाळेतून घरी आल्यावर ट्युशनला गेला व तिथे रडत होता. त्यानंतर तो घरी येऊन सुद्धा सतत रडत होता. आई-वडिलांनी त्याला का रडतोस ? काय झाले ? असे विचारले असता पीडित विद्यार्थ्याने आपबिती कथन केली. त्याच्यासोबत आरोपी शिक्षकाने कशाप्रकारे छळ केला याची हकीकत सांगितली. सदर प्रकरणामध्ये जळगाव पोलिसांनी पीडित विद्यार्थ्यांच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी शिक्षकाविरुद्ध कलम 377, 506 भादवी व सहकलम 4,6 पोक्सो प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाणेदार दिनेश झामरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक रंजना आवारे व सहकारी करत आहेत.
पीडित मुलांच्या नातेवाईकानी हे प्रकरण आपसात मिटवावे या करता राजकीय नेत्याकडून दबाव आणला होता मात्र तरीही हे प्रकरण दबले नाही. जळगाव जामोद पोलीस ठाण्यात वावरणारे विविध क्षेत्रातील मध्यस्थी नेहमीच सेटींगसाठी पुढाकार घेतात हे विशेष.