♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

‘ मारिया जोन्स ‘ बनून मेहकरच्या व्यक्तीला ६२ लाखांचा गंडा घालणारे दोघे नायजेरियन भामटे अखेर दिल्लीत पकडले… बुलडाणा सायबर सेलची यशस्वी कारवाई

MH 28 News Live बुलडाणा : फेसबुकवरच्या फ्रेंड रिक्वेस्ट आणि नंतर व्हाट्सअपवरची मैत्री ही जिल्ह्यातील व्यक्तीला महागात पडल्याची घटना उघडकीस आली. या घडलेल्या प्रकारामुळे फेसबुक युजर्ससाठी सोशल मीडियामध्ये एकच गोंधळ उडाला आहे.

जिल्ह्यातील मेहकर शहरामध्ये दीपक शिवराम जैताळकर हे जीवन ज्योती क्लिनिक नावाची पॅथॉलॉजी लॅब चालवत आहेत, त्यांना काही महिन्यापूर्वी आपल्या फेसबुकवर मारिया जोन्स या फेसबुक अकाउंट वरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात आली. नंतर ऑनलाईन चॅटिंग करत एकमेकांना व्हाट्सअप नंबर देण्यात आले. व्हाट्सअपवर त्यांची मैत्री झाली, दरम्यान मारीयाने एक गिफ्ट पाठवले असून त्यासाठी हे पार्सल दिल्ली येथील एअरपोर्टवरून सोडवून घेण्यासाठी कॉल आले. आणि अज्ञात व्यक्तीने ६५ हजार रकमेचे ब्रिटिश पाउंड देण्याच्या नावाखाली तसेच इतर कागदपत्रे काढण्यासाठी वेगवेगळ्या तारखेत रक्कम भरणा करायला लावले. एकूण ६२ लाख रुपये देऊन ही गिफ्ट न मिळाल्याने त्यांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची बाब लक्षात आले.

दीपक जैताळकर यांनी १५ ऑगस्ट रोजी बुलडाणा सायबर क्राईम पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने अज्ञात आरोपी विरुद्ध विविध कलमान्वय गुन्हे दाखल करण्यात आले. पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सारंग नवलकर यांनी सुरू केला असता तांत्रिक पुरावे हाती लागल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिसांचा एक पथक आरोपींच्या शोधार्थ दिल्लीला रवाना करण्यात आला. या पथकाने दिल्लीतून २ नायजेरियन आरोपींना ताब्यात घेऊन बुलडाणा आणले असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129