♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

माजी आमदार विजयराज शिंदे अपघातातून बचावले; कारचा झाला चकनाचूर, अकोल्या जवळ झाला अपघात

MH 28 News Live : बुलढाणा मतदारसंघाचे माजी आमदार व भारतीय जनता पक्षाचे लोकसभा संपर्क प्रमुख विजयराज शिंदे अमरावती येथे आपल्या कारमधून जात असताना अकोला शहराजवळ दि. ७ आक्टोबर रोजी दुपारी १२ . १५ वाजेच्या सुमारास एसटी बसची कारला जोरदार धडक बसल्याने अपघात झाला. सुदैवाने या अपघातातून शिंदे सुखरूप बचावले असून त्यांना थोडी दुखापत झाल्यामुळे अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा सदस्य खा. डॉ. अनिल बोंडे यांना भेटण्यासाठी माजी आमदार विजयराव शिंदे हे अमरावतीकडे निघाले असताना हा अपघात घडला. समोरून येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसने विजयराज शिंदे यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. मात्र, दुसऱ्याच क्षणी कारच्या एअरबॅग उघडल्याने सुदैवाने हानी टळली. या अपघातात माजी आमदार शिंदे आणि त्यांचा कारचालक दोघेही जखमी झाले आहेत. अकोला येथील रुग्णालयात दोघांना हलविण्यात आले. अकोला दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विमानतळावर सदिच्छा भेट घेऊन विजयराज शिंदे अमरावतीकडे रवाना झाले होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129