
आयपीएल सट्टा जोमात पोलीस मात्र कोमात
MH 28 News Live, चिखली : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल ही जागतिक क्रिकेटविश्वात अतिशय लोकप्रिय ठरलेली अशी क्रीडा स्पर्धा आहे. या स्पर्धेचे आयोजन करणारी भारतीय क्रिकेट नियामक संस्था अर्थात बीसीसीआय आणि या स्पर्धेत खेळणार खेळाडू हे दरवर्षी मालामाल होत असतात. परंतु, त्यासोबतच या स्पर्धेवर मोठ्या प्रमाणात लागणारा सट्टा हादेखील या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरला असून या सट्ट्याघे लोन गाव खेड्यांपर्यंत पोहोचले आहे. चिखली शहरात देखील आयपीएल स्पर्धेदरम्यान मोठ्या प्रमाणावर सट्टा लागत असून या या अवैध जुगाराकडे पोलिसांचे मात्र अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याची शहरांमध्ये चर्चा आहे.
26 मार्च पासून सुरु झालेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना 29 मे रोजी खेळवला जाणार आहे. सुमारे दोन महिने चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये अनेक संघ सहभागी झाले असले असून या स्पर्धेच्या या स्पर्धेच्या वेळापत्रकावर, फलंदाज असलेल्या रन्स आणि गोलंदाज घेत असलेल्या विकेट्सवर सट्टेबाजांची मात्र बारीक नजर असते. कोणता खेळाडू किती धावा काढतो, कोणता गोलंदाज किती बळी घेतो यावर मुख्यतः सट्टा लावला जातो. याशिवाय कोणता संघ किती धावांचा डोंगर असतो आणि कोणता संघ विजयी अथवा पराभूत होतो यावर देखील मोठ्या प्रमाणात बेटिंग होते. खात्रीलायक माहितीनुसार दररोजच्या क्रिकेट सामन्यांवर चिखली शहरांमध्ये दहा लाखापेक्षा अधिक रकमेचा सट्टा लावला जातो, स्पर्धेच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत कोट्यवधी रुपयांची उलाढाल एकट्या चिखली शहरात होत असल्याचे समजते.
या बेटिंगमध्ये अनेक व्यापारी, लहान-मोठे व्यवसायिक आणि मुख्यतः तरुण वर्ग सहभागी होतो. बरेचदा आयपीएल सट्ट्यामध्ये लावण्यासाठी पैसे उपलब्ध नसत नसल्यामुळे व्याजाने पैसे काढणे, कर्ज काढून सट्टा लावणे असे प्रकार होत असून सट्ट्यामध्ये नुकसान झाल्यास मात्र सट्टेबाज व त्याचे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडते. चिखली शहरांमध्ये अनेक लहान-मोठ्या दुकानांमध्ये तसेच विशिष्ट ठिकाणी आयटीआयचा सट्टा लावल्या जात असल्याची खात्रीलायक माहिती असून या प्रकारामध्ये रॅकेट सक्रिय असल्याचे बोलले जात आहे. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व घडामोडींपासून पोलिस अनभिज्ञ आहेत असे मुळीच नाही. मात्र अद्यापही चिखली पोलीसांकडून आयपीएल क्रिकेटमध्ये सट्टा लावणाऱ्या जुगार्यांवर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे पोलीसांच्या कार्यक्षमतेवर व त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह मात्र उपस्थित होत आहे.
काही दिवसांपूर्वी खामगावमध्ये आयपीएस सट्टेबाजांवर कारवाई करण्यात आली होती. परंतु त्यानंतर अशा प्रकारची कारवाई जिल्ह्यात कुठे झाल्याचे ऐकिवात नाही. केवळ खामगाव येथे कारवाई करून पुरेसे होणार नसून जिल्ह्यातील अन्य ठिकाणी देखील पोलीसांनी आयपीएल सट्टेबाजांवर कारवाई करून या जुगाराची पाळेमुळे खणून काढणे आवश्यक असल्याचे मत जनतेमध्ये व्यक्त होत आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button