♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

नाशिक ड्रग प्रकरणात ” माजी नगराध्यक्ष यांचा कोणता भाऊ ?” चौकशी करण्याची भाजपा यूवा मोर्चाची मागणी

MH 28 News Live चिखली : नाशिक ड्रॅग प्रकरणात चिखली येथील एका मोठया नेत्याचा भाऊ गुंतलेला असल्याचा संशय काही सुजाण नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला होता . या प्रकरणात चिखली मधील ” माजी नगराध्यक्ष यांचा भाऊ ” असल्याचा संशय व्यक्त होत असून तो ” भाऊ कोण ” याचा शोध घेऊन या प्रकरणाची चौकशी करून यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी चिखली शहर भारतीय युवा मोर्चाच्या वतीने ठाणेदार चिखली यांना एका निवेदनाव्दारे केली आहे.

दि. २० ऑक्टोबर रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक येथील ड्रग प्रकरण गाजत आहे. या ड्रग प्रकरणाचा चिखली सोबत संबंध जोडल्या जात असून काही सुज्ञ नागरिकांनी याबाबत नाशिक ड्रग प्रकरणात चिखली येथील एका मोठया नेत्याचा भाऊ असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे या प्रकरणी चिखली शहरात खळबळ माजली असून खरेच या ड्रग प्रकरणात चिखलीच्या ज्या कोणी तथाकथित मोठया नेत्याचा ” भाऊ ” असेल त्याचा कसून शोध घेऊन तरुणांना बरबाद करणाऱ्या अशा दुष्ट प्रवृत्तीला जेर बंद करणे अत्यावश्यक आहे.

चिखली शहरात गेल्या कित्येक वर्षांपासून अवैध धंद्यांना कुणाचा वरद हस्त लाभलेला आहे हे सर्व श्रुत आहे सदर प्रकरणात एका माजी ” नगराध्यक्ष भाऊ ” गुंतलेला असल्याचा संशय नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
परंतू ” नऊ सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली ” या उक्ती प्रमाणे काही संघटना या ड्रग माफिया प्रकरणात नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा सुद्धा प्रयत्न केल्या जात आहे. सदर प्रकरण अत्यंत गंभीर असून खरोखर चिखलीत तरूण पिढीला बरबाद अशा प्रकारचा ड्रगचा व्यवसाय होत असेल तर त्यावर तातडीने आळा घातला पाहिजे. त्यामुळे या प्रकरणी तातडीने चौकशी करून यातील दोषींवर कठोर कारवाई करून चिखली शहर अवैध धंदे मुक्त करण्याची मागणी देखील निवेदनात केली आहे.

निवेदनावर सुहास शेटे, सुभाषाप्पा झगडे,सागर पुरोहित, शुभम पडघान,युवराज भुसारी,सचिन कोकाटे, सुरज थोरवे,विजय वाळेकर, दत्ता सुसर, विजय कऱ्हाडे,विक्की शिनगारे,चेतन देशमुख, कार्तिक जोशी,नारायण भुजबळ,तुषार भावसार,शैलेश देशमुख,सागर जाधव, सागर खरात, योगेश गोरे, योगेश झगडे, अनिल इंगळे, ऋषी ढवळे,पवन घोरपडे, अशोक सराफ, प्रस वयाळ, विशाल पवार ,सौरभ पडघान, उमेश खरे, पवन घुबे, शंकर उदरकर,कैवल्य कुलकर्णी,सागर पवार, श्याम साळवे,भूषण भावसार,नितीन गोरडे,नामु गुरुदासानी, बंटी अंभोरे, यांच्या सह्या आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129