♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

सुरळीत व मुबलक वीज पुरवठ्यासाठी चिखली महावितरण  उप विभागाच्या  पद निर्मितीसह विभाजनास मान्यता आ.  श्वेताताई महाले  यांच्या प्रयत्नाने  शेतकऱ्यांचा प्रलंबित सुटला

 

MH 28 News Live, चिखली : तालुक्याचा झालेला विस्तार, वाढलेले वीज ग्राहक, वाढती विजेची मागणी, कृषी पंपाच्या वाढत जाणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी अनेक वर्षापासून मागणी असलेले चिखली महावितरण उपविभागाचे विभाजन करण्यास मान्यता मिळाल्याने आ. श्वेताताई महाले यांच्या अथक प्रयत्नांना फार मोठे यश आले आहे. यामुळे चिखली तालुक्यातील व शहरातील विजेच्या समस्या लवकरात लवकर सुटून विज ग्राहकांना व शेतकऱ्यांना मुबलक व सुरळीत विज पुरवठा करणे सोपे जाणार आहे.

या विभाजनास मान्यते मिळाल्यामुळे आता तालुक्यात चिखली आणि उदयनगर हे दोन स्वतंत्र उपविभाग अस्तित्वात येतील. यात चिखली उपविभागात चिखली शहर शाखा १ , चिखली ग्रामीण शाखा २, मेरा शाखा आणि चिखली शहर भाग २ म्हणून नवीन शाखा निर्मिती होणार असून उदयनगर उपविभागात उदयनगर शाखा, अमडापुर शाखा, चिखली ग्रामीण १ शाखा आणि पेठ येथे नवीन निर्मिती शाखा सुरू होणार आहे.

३६ नवीन पदांची होणार निर्मिती

आ श्वेताताई महाले यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न व पाठपुराव्यामुळे दीर्घ काळापासून प्रलंबित असलेले चिखली महावितरणचे विभाजन झाले. त्यामुळे आणि चिखली तालुक्यांत होणाऱ्या नवीन शाखा निर्मितीमुळे तब्बल ३६ नवीन पदांची निर्मिती करण्यात आलेली आहे. यामध्ये उपकार्यकारी अभियंता वितरण १, सहाय्यक अभियंता वितरण ३, कनिष्ठ अभियंता वितरण १, निम्न स्तरलिपिक १, सहाय्यक लेखापाल १, उच्च स्तर लिपिक लेखा २, निम्न स्तर लिपिक लेखा ३, मुख्य तंत्रज्ञ १, प्रधान तंत्रज्ञ २ , वरिष्ठ तंत्रज्ञ १४, तंत्रज्ञ ६, तंत्रज्ञ १या नवीन पद निर्मितीचा समावेश आहे.

चिखली तालुक्यातील विज समस्या तातडीने सोडविणे शक्य होईल – आ श्वेताताई महाले

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अर्थात महावितरण विभागाच्या महावितरण उपविभाग निर्मितीच्या धोरणानुसार ग्रामीण उपविभागासाठी ३० हजार लाईव्ह ग्राहक संख्येसाठी एक उपविभाग असे सूत्र निश्चित करण्यात आलेले आहे. सध्या चिखली तालुक्यासाठी चिखली येथे महावितरणचे एक उपविभागीय कार्यालय अस्तित्वात आहे. चिखली तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ मोठे आहे. तालुक्यामध्ये १३४ आबाद गावे असून ९९ ग्रामपंचायती अस्तित्वात आहेत. उपविभागामध्ये घरगुती, वाणिज्य, औद्योगिक(RCI) चालू ग्राहकसंख्या सरासरी ५१,००० आहे.+ या कॅटेगिरी मधील बंद ग्राहक संख्या १४,००० आहे अशी एकूण ग्राहक संख्या ६५,००० हजार आहे. कृषी ग्राहक संख्या सरासरी १८,००० एवढी आहे. म्हणजेच RCI + Ag मिळून लाईव्ह ग्राहकसंख्या ६९,००० आहे. त्यासाठी लागणारा वार्षिक एकूण वीज वापर ३०० दशलक्ष युनिट आहे. महावितरणच्या धोरणानुसार सरासरी ३०,००० ग्राहक संख्येसाठी १ उपविभाग असतो. उपविभागातील ३०,००० ग्राहकसंख्येचा टप्पा हा चिखली उपविभागाने सन २०११-१२ मध्येच पार केला आहे. तथापि तत्कालीन लोकप्रतिनिधींनी या बाबीकडे दुर्लक्ष केल्यामुळे तसेच आपली जबाबदारी नीट पद्धतीने शासन दरबारी न मांडल्यामुळे प्रचंड ग्राहक संख्येसाठी एकच उपविभाग अस्तित्वात आहे. पर्यायाने तालुक्याभरातील नागरिकांना शेतकऱ्यांना कष्टाला सामोरे जावे लागत आहे. तसेच ग्राहक संख्येमध्ये मोठी वाढ झालेली असल्यामुळे त्या तुलनेत आकृतीबंधानुसार महावितरण अधिकारी,कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत होती व त्याचा ताण महावितरण विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यावर येत आहे. व विनाकारण जनतेमध्ये शासनाविषयी रोष निर्माण होत होता. आता उपविभागाचे विभाजन आणि नवीन शाखा निर्मितीसाठी मान्यता मिळाल्याने चिखली तालुक्यातील विज समस्या तातडीने सोडविणे शक्य होईल असे प्रतिपादन आ. श्वेताताई महाले यांनी यावेळी व्यक्त केले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129