♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

स्वस्त धान्याचे वितरणाबाबत आ. रायमुलकर म्हणाले की…

MH 28 News Live, लोणार : सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून स्वस्त धान्याचे वाटप झाला पाहिजे असे प्रतिपादन दक्षता कमिटीचे अध्यक्ष तथा पंचायत राज समितीचे अध्यक्ष आ. डॉ संजय रायमुलकर यांनी तहसील कार्यालयात आयोजित दक्षता समिती मध्ये केले.

दक्षता समितीची बेठक आ. डॉ संजय रायमूलकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी तहसीलदार सैपन नदाफ, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. बळीराम मापारी, स्वस्त धान्य दुकान संघटनेचे अध्यक्ष भगवानराव कोकाटे, नगरसेवक डॉ अनिल मापारी, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष मारोतराव धांडे, समिती सदस्य शंकर डोळे, पुरवठा विभागाचे पुरुषोत्तम आघाव उपस्थित होते.
या वेळी आमदार डॉ संजय रायमूलकर यांनी जे स्वस्त धान्य दुकानदार बेठकीला उपस्थित नाही त्यांना कारणे दाखवा नोटीस काढण्याचे आदेश दिले. बऱ्याच दिवसांपासून बेठक घ्यायची परंतु अडचणी आल्याने घेता आली नाही. दक्षता समितीचे काम म्हणजे गरीब गरजू लोकांना जे धान्य मिळते ते त्यांना त्यांच्या घरा पर्यंत पोहचून देण्याची जबाबदारी समितीची आहे कोणतेही चुकीचे काम होत असल्यास थांबवणे व द्वारपोच धान्य पोहचवणे ही समितीची जबाबदारी असून प्रत्येक धान्य कट्याचे वजन हे स्टॅंडर्ड केलेलेच असले पाहिजे; जो धान्य कमी देईल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल मला असे आढळल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल असा सज्जड दम आ. रायमुलकर यांनी दिला. ज्या गावांमध्ये अद्याप दक्षता समितीचे गठण झाले नाही त्या गावात दक्षता समिती लवकरच गठीत कराव्या कोणत्याही ग्राहकांची तक्रार असल्यास दोषींवर कडक कार्यवाही करणार, कोणत्याही ग्राहकने जर धान्य विकले आणि तसे आढळून आल्यास त्या ग्राहकाला माल न देण्याची कार्यवाही केली जाईल दुकानदारांनी साठा रजिस्टर सुद्धा व्यवस्थित ठेवावे त्याच्यात चुकी आढळल्यास कारवाई करणार असल्याचे सांगितले कोणताही दुकानदार ह्याची तक्रार आल्यास त्यावर कडक कार्यवाही करणार दोषी व तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना तहसीलदार सैफन नदाफ यांना आमदार डॉ संजय रायमूलकर यांनी दिल्या खराब माल ग्राहकांना देऊ नका खराब माल दुकानदार यांनी सुद्धा वाटप करू नये खाली पडलेला माल ग्राहकांना वाटप करू नये तो गोडाऊनला वापस करावा असे चुकीचे वाटप करताना आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई करणार
पुरवठा निरीक्षण अधिकारी यांना क्रॉस धान्य कट्टे चेक करण्याच्या सूचना दिल्या दुकानदार यांनी माल उशिरा नेयु नये दुकानात उरलेल्या मालाचा तात्काळ अहवाल सादर करावा जीर्ण झालेले फाटलेले कार्ड विभक्त करणाऱ्या नागरिकांना केम्प घेऊन वाटप करा अश्या सूचना दिल्या दुकानदार यांना कोणतेही दुकान तपासण्याचा अधिकार नाही असे कोणीही करू नये ग्राहकांच्या समस्या आल्यास आपण त्यांच्या समस्या चे निराकरण करावे जनतेच्या भोळे पणाचा फायदा घेऊ नका चुकी आढळल्यास कार्यवाही करणार
दुकाणदार यांनी मांडल्या समस्या वयोवृद्ध नागरिकांचा आंगठा येत नाही मशीन मध्ये सुद्धा खुप अडचणी येतात माल मशीन गहू तांदूळ येत नाही कटा पूर्ण ५० किलो भरत नाही मशीन मुळेच सर्व समस्या उद्धभवतात मशीनचा बंद आहे तर माल द्यावा कसा ठेकेदार हे लोणार गोदामला माल लवकर पाठवत नाही त्यामुळे माल वाटप करायला वेळ लागतो यावेळी लोणार तहसील चे कर्तव्यदक्ष तहसीलदार सैपन नदाफ यांनी स्वस्त धान्य वाटपामध्ये अनियमितता भ्रष्टाचार आढळून आल्यास त्या स्वस्त धान्य दुकानदार कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा तहसीलदार सैपन नदाफ यांनी दिला आहे. या वेळी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. अनिल मापारी यांचा वाढदिवसा निमित्त सत्कार करण्यात आला.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129