♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

वाढती लोकप्रियता पाहून श्वेताताईंना बदनाम करण्याचे हे विरोधकांचे कारस्थान कुंबेफळ येथील घटनेवर देविदास जाधव यांचे स्पष्टीकरण

  •  MH 28 News Live / चिखली  :  आपल्या झंजावाती विकास कामाने चिखली विधानसभा मतदारसंघातील शहर व ग्रामीण भागात प्रचंड लोकप्रियता मिळवणाऱ्या आ. श्वेताताई महाले यांना प्राप्त होणारे समाजातील सर्व शहरातील जन समर्थन पाहून विरोधकांचे पित्त खवळले आहे व त्यांना आपल्या राजकीय भविष्याची चिंता सतावू लागली आहे. याच भेटीपोटी आ. श्वेताताई महाले यांना कुठल्या ना कुठल्या कारणाने बदनाम करण्याचे व त्यांच्याबद्दल गैरसमज निर्माण करण्याचे कारस्थान काही विघ्न संतोषी प्रवृत्तीचे लोक रचत असून त्याचाच एक भाग म्हणून कुंबेफळ येथील घटनेचा बनाव रचण्यात आला आहे. असे खालच्या पातळीचे राजकारण करणाऱ्या प्रवृत्तीचा आपण अधिकार करतो असे स्पष्टीकरण भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस देविदास जाधव यांनी केले आहे.

चिखली मतदारसंघाअंतर्गत गोट्यावधी रुपयांची विकास कामे करणाऱ्या आमदार श्वेता ताई महाले यांच्या माध्यमातून आपल्या गावात देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भवन निर्माण व्हावे या चांगल्या उद्देशाने धाड सर्कलमधील कुंबेफळ येथील बौद्ध समाजाच्या वतीने दि. २३ मे रोजी आ. श्वेताताई महाले यांना बुद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले होते. चांगल्या पद्धतीने नियोजन केलेल्या या कार्यक्रमात श्वेताताईंनी भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना अभिवादन केले. सदर कार्यक्रमात उपस्थित असलेल्या संतोष हिवाळे नामक काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याने मद्यपान केलेल्या अवस्थेत बेताल बडबड केली. आ. महाले यांच्या बद्दल देखील त्याने आक्षेपार्ह विधान केल्यामुळे स्थानिक लोकांनीच याबद्दलची तक्रार धाड पोलिसांकडे केली. या तक्रारीवरून धाड पोलिसांनी संतोष हिवाळे यास पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्याची चौकशी केली व काही वेळ बसवून ठेवले. नंतर या इसमास समज देऊन सोडून देण्यात आले. मात्र या कायदेशीर कारवाईला जातीय वळण देऊन ‘ राईचा पर्वत ‘ करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला असा आरोप देविदास जाधव यांनी या आपल्या स्पष्टीकरणातून केला आहे.

हे तर निव्वळ राजकीय कारस्थान

” सबका साथ सबका विकास सबका विश्वास ” या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्रिसूत्रीनुसार कार्य करणाऱ्या आ. श्वेताताई महाले यांची प्रत्येक समाज घटकाबद्दल सदैव न्यायाची भूमिका राहिली आहे. बौद्ध समाजाला देखील अनेक ठिकाणी बुद्ध विहार तसेच स्मशानभूमीसाठी आ. महाले यांनी सढळ हाताने निधी दिला आहे. त्यामुळे या समाजात श्वेताताईंबद्दल आपुलकीची भावना निर्माण होत आहे. वर्षानुवर्षे या समाजाचा वापर मतांसाठी करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांचा पोटात मात्र त्यामुळे पोटसुळ उठला असून त्यांना आपले राजकीय भवितव्य धोक्यात असल्याची भिती वाटत आहे. याच भयापोटी त्यांनी असे निंदनीय कारस्थान राजकीय स्वार्थापायी केल्याचे देविदास जाधव यांनी म्हटले आहे.

असली कामे काँग्रेसचेच नेते करतात

सत्ता पदाचा दुरुपयोग करून समाजातील सर्वसामान्य व गोरगरिबांना धमकावण्याचे काम आजवर काँग्रेस पक्षातीलच नेत्यांनी केल्याचे केल्याचा आरोप देविदास जाधव यांनी आपल्या स्पष्टीकरणातून केला आहे. वर्षभरापूर्वीच चिखली मतदारसंघातील काँग्रेसच्या एका नेत्याने भर दिवसा रस्त्यावर आपल्या साथीदारांसह एकट्या व्यक्तीचा पाठलाग करत त्या व्यक्तीला बेदम मारहाण केली, या घटनेतून त्यांनी स्वतःची राजकीय संस्कृती काय आहे हेच दाखवून दिले असा टोला देखील देविदास जाधव यांनी आपल्या स्पष्टीकरणातून मारला आहे. असली कामे करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या एका मद्यपी कार्यकर्त्याने आ. श्वेताताई महाले यांच्यावर व्यक्तीद्वेषाच्या भावनेतून कपोलकल्पित आरोप करणे शोभत नाही असे देखील देविदास जाधव यांनी आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129