
संताजी जगनाडे महाराज समाजभवनासाठी भरघोस निधी देणार आ. श्वेताताई महाले यांची तेली समाज शिष्टमंडळाला ग्वाही
MH 28 News Live : चिखली : तेली समाजाकडून अपेक्षा व्यक्त केल्याप्रमाणे संताजी जगनाडे महाराज समाज भवनासाठी तेली समाजाला भरघोस आर्थिक निधी देणार असल्याची ग्वाही आ. श्वेताताई महाले यांच्या वतीने देण्यात आली. दि. १३ जुलै रोजी समाजाच्या शिष्टमंडळाने आ. महाले यांना निवेदन सादर करून समाज भवनाच्या बांधकामासाठी निधीची मागणी केली असता श्रीमती महाले यांच्या वतीने भरघोस आर्थिक मदत करण्याचे ठोस आश्वासन शिष्टमंडळाला देण्यात आले.
तेली युवा मंच या नोंदणीकृत संस्थेच्या माध्यमातून चिखली शहरातील तेली समाजाच्या शिष्टमंडळाने आ. श्वेताताई महाले यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागणीचे निवेदन सादर केले. या निवेदनामधून समाजाने संताजी जगनाडे महाराज समाज भवनाच्या बांधकामासाठी निधीची मागणी केली आहे. तेली युवा मंच या संस्थेच्या मालकीची ७२०० स्क्वेअर फुट जमीन चिखली शहरातील वार्ड क्र. १४ मधील खडकपुरा येथे असून त्या जागेवर संकल्पित समाज भवनाचे बांधकाम करण्याचा तेली समाजाचा मानस आहे. याकरिता राज्य शासनाच्या प्रतिनिधी म्हणून आ. श्वेताताई महाले यांनी शासनाकडून निधी मिळवून द्यावा अशी अपेक्षा या शिष्टमंडळाने भेटी प्रसंगी व्यक्त केली. संताजी जगनाडे महाराज समाज भवनाच्या माध्यमातून शहरातील तेली समाज संघटित होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करत आ. श्वेताताई महाले यांनी समाज भवनाच्या निर्मितीसाठी आपण भरघोस निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही यावेळी शिष्टमंडळाशी बोलताना दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सचिव विद्याधर महाले यांच्या सोबत देखील तेली समाज शिष्टमंडळाने समाज भावनाच्या निर्मितीसंदर्भात चर्चा केली.
तेली युवा मंचचे अध्यक्ष रमेश दिवटे, उपाध्यक्ष मुकुंद्र येडोले, सचिव राजेंद्र हरणे, सहसचिव विनोद हिंगे, कोषाध्यक्ष तुषार लोखंडे सदस्य सागर भोलाने, प्रदीप लोखंडे, सुभाष डोमळे, राजू सराफ, ज्ञानेश्वर सोनूने, गजानन येंडोले, दत्ताभ्यय वाडेकर, गोपाल देव्हडे, विजय इंगळे, सतीश वाघ, रविकांत वानरखेडे, श्रीकांत वानखेडे, तुषार लोखंडे, पंकज खोपाळे, विजय वाघमारे, राजेंद्र मेहेद्रे, गणेश सोनूने, चंद्रकांत लोखंडे, प्रलाद आंबेकर, पंकज खोपाले, राम रामकृष्ण डोमळे, निखिल डोमळे, गजानन हिंगे, शिवप्रसाद जाधव, शाम करवंदे, विश्वनाथ क्षीरसागर, विजय करवंदे, अनंता सुरडकर, राजेंद्र मेहेत्रे, देवानंद करवंदे, गणेश नालिंदे यांच्यासह ज्येष्ठ नेते रामदासभाऊ देव्हडे, चिखली अर्बन बँकेचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम दिवटे, राजेंद्र माळोदे, अरुण सोनवणे, सुभाष देव्हडे, शरद करवंदे, कृष्णा पन्हाळे, गोपाल म्हसुरे आदी तेली समाज बांधव निवेदन देतेवेळी उपस्थित होते.