♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

ही निवडणूक तरुणांना रोजगार व हिंदुत्वाच्या मुद्दयावरच लढली जाणार – विजय पवार रेणुका मातेला नत मस्तक होउन केले प्रचारास सुरवात

MH 28 News Live /  चिखली : चिखलीकरांची आराध्य दैवत रेणुका मातेला नतमस्तक होऊन चिखली विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विजय पवार यांनी दि. ७ नोव्हेंबर रोजी आपल्या प्रचाराला शुभारंभ केला. आगामी विधानसभा निवडणुक ही तरुणांना रोजगार व हिंदुत्वाच्या मुद्दयावरच लढली जाणार असे विजय पवार यांनी या प्रसंगी स्पष्ट केले.

दि. ७ नोव्हेंबर २०२४ रोजी अपक्ष उमेदवार विजय मारोतराव पवार यांनी आपल्या प्रचाराची सुरवात चिखलीचे ग्रामदैवत रेणुका माते समोर नतमस्तक होऊन केली. यावेळी त्यांच्या सोबत राकेश चोपडा, किरण महाराज शिंदे, गजानन महाराज ठेंग, रवि माळवंदे ,राहूल जवंजाळ, गजानन गायकवाड, गोपाल गायकवाड, विलास शिंदे, भानुदास पवार, अजय मोरे व मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्याची उपस्थिती होती. यावेळी प्रतिक्रिया देताना विजय पवार म्हणाले कि, हि निवडणूक माझ्यासारख्या सामान्य व एकनिष्ठ कार्यकर्त्यासाठी अग्निपरीक्षा समान आहे. आणि माझ्यासारखेच प्रामाणिक, एकनिष्ठ व हिंदुत्वासाठी अहोरात्र झटणारे माझे जेष्ठ व तरुण सहकाऱ्यांचिच मला या निवडणुकीत खरी मदत होणार असून जो तो आपल्या आपल्या परीने मला मदत करत आहे. आम्हालाही तेच हवे जो सच्च्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला हवे आहे आणि आम्ही निवडून आल्यावर तेच करू जे आम्हाला आज पर्यंत ज्ञात आहे. यासाठी हि लढाई मतविभाजनासाठी नसून माझ्यासारख्या तमाम सामान्य कार्यकर्त्यांच्या परिश्रमाची, मान सन्मानाची व त्यांनी धर्मासाठी आजपर्यंत केलेल्या त्यागाची खरी किंमत ठरवण्यासाठीची ही लढाई आहे. धर्मासाठी लढणारा आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा खूप अमुल्य असून त्यांची साथ मला या निवडणुकीत नक्कीच मिळेल असे प्रतिपादन विजय पवार यांनी प्रचार शुभारंभाच्या वेळी केले.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129