जिल्ह्यात रेशनच्या धान्याचा काळाबाजार तेजीत; ८७० गावांमध्ये दक्षता समित्याच अस्तित्वात नाहीत
MH 28 News Live : स्वस्त धान्याची काळ्या बाजारात विक्री होऊ नये, रेशन धान्याचा पुरवठा व वितरण पारदर्शक पद्धतीने व्हावे, यामध्ये कुठेही अनियमितता होऊ नये, प्रत्येक लाभार्थीला रेशनधान्य मिळावे, यावर वॉच ठेवण्यासाठी प्रत्येक गावात दक्षता समितीचे गठण करण्यात येते. जिल्ह्यात मात्र, गाव, नगरपरिषद ते महापालिका स्तरावर या समित्या आचारसंहितेमुळे बरखास्त करण्यात आल्या आहेत. आता नव्याने गावांमध्ये जिल्ह्यातील ८७० लवकरच स्थापना समित्यांची करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात ग्रामस्तर ८७०, नगर परिषद स्तरावर ११ व नगर पंचायत स्तरावर दोन समित्या जिल्ह्यात अस्तित्वात असायला पाहिजे, नगरपरिषदेमध्ये प्रशासक राज असल्याने तसेच आचारसंहिता असल्याने या समित्या बरखास्त करण्यात आल्या आहेत. आता नव्याने या समित्यांची स्थापना करण्यात येणार आहे. रेशन वितरण व्यवस्थेसह विविध समस्या सोडवण्याचे काम समितीकडून केले जाते.
ग्राम पातळीवर दक्षता समितीमध्ये अध्यक्ष सरपंच व सचिव संबंधित तलाठी असतो. सदस्य म्हणून पोलिस पाटील, ग्रामसेवक, सोसायटी अध्यक्ष, तीन महिला, विरोधी पक्षाचे दोन सदस्य, एससी, एसटीचा एक प्रतिनिधी, एक सामाजिक कार्यकर्त्याचा समावेश असतो. दक्षता समितीचा कार्यकाळ हा तीन वर्षाचा असतो व कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर नव्या कार्यकारिणीची निवड पुन्हा ग्रामसभेमधून केली जाते. समितीची महिन्यातून एक बैठक होत असते. जिल्ह्यात गावस्तरावर ८७०, नगरपालिकास्तरावर १२ आणि नगरपंचायतस्तरावर दोन अशा समित्या स्थापन होणे अपेक्षित आहे. मात्र, सध्या या समित्या बरखास्त करण्यात आल्या आहेत. आता नव्याने समित्या गठीत होणार आहेत.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button